शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

बोदलीजवळच्या जंगलात वाघाचा इसमावर जबर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 5:00 AM

लालाजी यांच्यासह बोदली गावातील ७ इसम बोदलीपासून २ ते २.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात (कक्ष क्रमांक १७९) सिंधी आणण्यासाठी गेले होते. १२.३० वाजताच्या सुमारास लालाजी यांच्या आरडाओरड करण्याचा आवाज त्यांना आला. त्यामुळे बाकी लोकांनीही आरडाओरड करत तिकडे धाव घेतल्याने वाघाने तेथून जंगलात धूम ठोकली. पण वाघाच्या तावडीतून सुटलेल्या लालाजी यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरापासून काही अंतरावर असलेल्या बोदली बिटमध्ये सिंधी कापण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात त्या इसमाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. लालाजी मारोती मोहुर्ले (५० वर्ष) असे जखमी इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, लालाजी यांच्यासह बोदली गावातील ७ इसम बोदलीपासून २ ते २.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात (कक्ष क्रमांक १७९) सिंधी आणण्यासाठी गेले होते. १२.३० वाजताच्या सुमारास लालाजी यांच्या आरडाओरड करण्याचा आवाज त्यांना आला. त्यामुळे बाकी लोकांनीही आरडाओरड करत तिकडे धाव घेतल्याने वाघाने तेथून जंगलात धूम ठोकली. पण वाघाच्या तावडीतून सुटलेल्या लालाजी यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी शि.र. यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक (रोहयो) सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, क्षेत्र सहायक श्रीकांत नवघरे, वनपाल वैभव रामणे, काळे, वाघ नियंत्रण पथकाचे वनपाल किरमे, बिट वनरक्षक भसारकर, तसेच राजू कोडापे, धर्मराव दुर्गमवार, गौरव हेमके, साई टेकाम आदी वनरक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच प्रत्यक्षदर्शींकडून माहिती जाणून घेतली. घटनास्थळी केलेल्या पाहणीत वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. अधिक चौकशी उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी आणि सहायक वनसंरक्षक भडके यांच्या मार्गदर्शनात आरएफओ पेंदाम करीत आहेत.

सूचनांकडे केले दुर्लक्ष, बसून असल्यानेच हल्लावाघांचे हल्ले टाळण्यासाठी वनविभागाकडून वाघ सनियंत्रण पथकामार्फत विविध सूचना केल्या आहेत. जंगलात जाऊ नये अशी दवंडीही दिली आहे. पिपल फॉर एन्वारमेंट अँड ॲनिमल या संस्थेने सिंधी तोडण्यासाठी जात असलेल्या नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याबाबतही जनजागृती केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना घडत आहेत. विशेष म्हणजे जखमी लालाजी हे बसून सिंधी तोडत होते. त्यामुळेच वाघाने त्यांच्यावर हल्ला करण्याची हिंमत केल्याचे या घटनेत आढळून आले.

 

टॅग्स :Tigerवाघ