गडचिराेली : एटापल्ली वनपरिक्षेत्रात वाघिणीची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाने ४ आराेपींना अटक केली हाेती. या चारही आराेपींना शनिवार २ डिसेंबर राेजी चामाेर्शीच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या आराेपींची रवानगी चंद्रपूरच्या कारागृहात केली.
वन विभागाच्या चमूने २९ नाेव्हेंबर राेजी दाेन आराेपींना वाघिणीच्या कातड्यासह अटक केली हाेती. त्यानंतर ३० नाेव्हेंबर राेजी पुन्हा दाेन आराेपींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी श्यामराव नराेटे व अमजदखां पठाण ह्या दाेन आराेपींना दाेन दिवसांची वनकाेठडी झाली हाेती. त्यानंतर अटक केलेले रामा गावडे व जगन्नाथ मट्टामी ह्या दाेन्ही अशा चारही आराेपींना शनिवारी चामाेर्शीच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी चंद्रपूरच्या कारागृहात केली. या घटनेचा अधिक तपास भामरागड वन विभागाचे सहायक वनसंरक्षक अशाेक पवार करीत आहे.