शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

महिलेचा बळी घेणारी वाघीण जेरबंद, ताडोबा रेस्क्यू टीमची कारवाई

By संजय तिपाले | Published: September 17, 2023 2:08 PM

फरी जंगलात होती दहशत

संजय तिपाले/गडचिरोली: गवत कापण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर हल्ला करून बळी घेणाऱ्या टी- १४ वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला १७ सप्टेंबरला सायंकाळी यश आले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बचाव पथकाने देसाईगंज वनक्षेत्रात ही कारवाई केली.

देसाईगंज वनक्षेत्रातील फरी येथे जंगलाला चिकटून शेती आहे. ११ सप्टेंबर रोजी महानंदा मोहूर्ले (५१, रा. फरी) या गवत कापण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी  कक्ष क्र. ८५३ मध्ये टी- १४  या  वाघिणीने हल्ला केला. त्यानंतर ५० मीटर अंतरावर जंगलात फरफटत नेऊन ठार केले होते. यानंतर त्याच रात्री या वाघिणीने शेळीचा फडशा पाडला होता. या वाघिणीचे वास्तव्य कायम असल्याने उसेगाव, फरी, शिवराजपूर, अरततोंडी या मार्गावर आवागमन करणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सापळा लावून ट्रॅप कॅमेरेही लावले होते. वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र- शिवराजपुर मधील कक्ष क्र. ८६६ मध्ये चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे यांनी डार्ट करून (इंजेक्शन देऊन) वाघिणीला बेशुद्ध केले. त्यानंतर चमुच्या सहाय्याने तिला कोणतीही इजा न करता पिंजऱ्यात कैद केले. वनसंरक्षक एस. रमेशकुमार, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, उपविभागीय अधिकारी मनोज चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे,  क्षेत्रीय कर्मचारी अक्षय दांडेकर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

तपासणी करून पाठवले नागपूर व्याघ्रप्रकल्पात जेरबंद करण्यात आलेल्या टी- १४ वाघिणीचे वय अंदाजे २ वर्षे आहे. सदर वाघिण।णीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला बाळासाहेब ठाकरे, आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय गोरेवाडा, नागपुर येथे हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पTigerवाघ