शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

गडचिरोली जिल्ह्यात राखीची ओवाळणी म्हणून गावात खर्रा बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:54 PM

भामरागड तालुक्यातील कोठी येथील महिला दारूबंदी व खर्राबंदी समितीच्या सदस्यांनी पोलिसांना राखी बांधल्यांनतर ओवाळणी म्हणून गावातील खर्रा बंद करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देतंबाखूयुक्त साहित्याची होळीकोठीतील महिलांना रक्षाबंधनाची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोठी येथील महिला दारूबंदी व खर्राबंदी समितीच्या सदस्यांनी पोलिसांना राखी बांधल्यांनतर ओवाळणी म्हणून गावातील खर्रा बंद करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी खर्रा विक्रेत्यांवर धाड टाकून खर्रा बनविण्याचे साहित्य जप्त केले.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुगंधीत तंबाखूपासून बनलेल्या खऱ्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. यात प्रत्येक कुटुंबाचा खर्च तीन हजार रूपायांपेक्षाही अधिक आहे. महाराष्ट्रात या तंबाखूवर बंदी असली तरी नजीकच्या छत्तीसगड राज्यातून हा तंबाखू आणला जातो. त्यामुळे बंदीनंतरही या खर्याची विक्री गावागावात खुलेआम सुरू आहे. खर्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो, कुटुंबाला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागतो. मुक्तीपथ या स्वयंसेवी संस्थेने जिल्हाभरात खर्रा व तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याचे काम मागील वर्षभरापासून हाती घेतले आहे. या संस्थेच्या पुढाकारातून गावस्तरावर समित्या गठीत केल्या आहेत. नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या कोठी गावातही महिला दारूबंदी समिती, सुगंधीत तंबाखू विरोधी महिला समिती गठित करण्यात आली आहे.रक्षाबंधनाच्या दिवशी या महिला सदस्यांनी गावातीलच पोलीस मदत केंद्राच्या जवानांना राख्या बांधल्या. ओवाळणी म्हणून गावात खर्राबंदी करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी लगेच गावातील पाच पानठेल्यांवर धाड टाकून खर्रा बनविण्याच्या पाच मशिन व इतर साहित्य जप्त करून साहित्याची होळी करुन महिलांना रक्षाबंधनाची भेट दिली. या उपक्रमामुळे गावात खर्राबंदी होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन