गोपाल लाजूरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतवर्षाला गौरवान्वित करणारा व देशभक्ती व देशप्रेमाने उर दाटून येणारा विजयोत्सव देशाने १९ वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी कारगिल युद्धातील विजयाने अनुभवला. देशप्रेम व देशभक्तीचा हा विजयोत्सव गडचिरोली शहरात दरवर्षी अखंडितपणे साजरा केला जात आहे. या विजयाच्या स्मृतींना गुरूवारी उजाळा दिला जाणार आहे.१९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या प्रसंगी पाकिस्तान विरूद्ध भारतातील जनमाणसात चीड व द्वेषाची भावना निर्माण झाली असतानाच गडचिरोली शहरसुद्धा माध्यम होते. शहरात सामाजिक कार्यकर्त्यांकडून देशभक्ती व देशप्रेमाची भावना समाजात निर्माण करण्याचे काम सुरू होते. भारत देशाने मोठ्या ताकदीने पाकिस्तानचे आक्रमण परतून लावून त्यांना पराभूत केल्यानंतर देशात आनंद व उत्साहाची लाट पसरली. यापासून गडचिरोली शहर सुद्धा सुटले नाही. विजयानंतर तीन महिन्याने शहरात दुर्गादेवी उत्सव आला. या उत्सवात दुर्गादेवीचा देखावा साकारण्यात आला. परंतु हा देखावा सर्वसाधारण नव्हता. पहिल्यांदाच जिवंत देखावा साकारण्यात आला. या देखाव्यामध्ये भारतीय सैन्य व पाकिस्तानच्या सैन्यातील युद्ध, तोफ, रणगाडा, हेलिकॉप्टर आदींचा समावेश होता. देखावा इतका प्रसिद्ध झाला होता. जिल्हाभरातून प्रेक्षकांची गर्दी देखावा बघण्यासाठी चंद्रपूर रोडलगत बाजार परिसरात उसळत होती. जिल्ह्यासह बाहेरही या देखाव्याची प्रचंड ख्याती पसरली.कारगिल चौकाचे नामकरण व कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ स्थापन करण्याकरिता शहरातील नागरिक उदय धकाते, प्रकाश भांडेकर, हिरालाल बिश्वास, विजय पिल्ले, नरेंद्र चन्नावार, गणेश नंदनवार, सुभाष माधमशेट्टीवार, मोतीराम हजारे, श्रावण कापगते, अनिल तेलंग, बाळासाहेब पद्मावार, डॉ.बिडकर, मोबिन सय्यद, सुशील देशमुख, सोनिया बैस, रेवनाथ गोवर्धन, किशोर सोनटक्के यांनी पुढाकार घेतला. नागरिकांमध्ये देशभक्ती, देशप्रेम व बलिदानाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.कारगिलच्या नावावर चौक व मंडळ स्थापनकारगिल युद्धाच्या विजयानंतर आलेल्या पहिल्याच दुर्गा उत्सवात युद्धातील देखाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने दुर्गा उत्सव मंडळाने उत्सव स्थळ व परिसराला कारगिल चौक नाव देण्याचे ठरविले. याकरिता रितसर नगर परिषदेची परवानगीही घेतली. त्यानुसार चंद्रपूर मार्गावरील आठवडी बाजार परिसराला कारगिल चौक हे नाव देण्यात आले. केवळ चौकालाच नाव न देता दुर्गा उत्सव मंडळाचेही नामकरण कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ करण्यात आले. चौकस्थळी केवळ एक बोर्ड लावण्यात आला आहे. कारगिल विजयासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यासाठी कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. नवरात्र उत्सवात मंडळातर्फे विविध स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना बक्षीसांचे वितरण केले जाते. तसेच दरवर्षी कारगिल विजय दिन उत्साहात साजरा केला जातो.
आज जागविणार कारगिल विजयाच्या स्मृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:06 AM
भारतवर्षाला गौरवान्वित करणारा व देशभक्ती व देशप्रेमाने उर दाटून येणारा विजयोत्सव देशाने १९ वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी कारगिल युद्धातील विजयाने अनुभवला. देशप्रेम व देशभक्तीचा हा विजयोत्सव गडचिरोली शहरात दरवर्षी अखंडितपणे साजरा केला जात आहे. या विजयाच्या स्मृतींना गुरूवारी उजाळा दिला जाणार आहे.
ठळक मुद्दे१९ वर्षांपासून विजयोत्सव : देशभक्ती, देशप्रेम निर्माण करण्याची नि:स्वार्थ भावना