शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

शौचालयाचे काम ६५ टक्के

By admin | Published: March 27, 2017 12:48 AM

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली नगर पालिका प्रशासनाला शासनाने ३ हजार ५ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले.

१३९३ शौचालये पूर्ण : गडचिरोली पालिकेने केला आतापर्यंत सव्वातीन कोटींचा खर्चगडचिरोली : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली नगर पालिका प्रशासनाला शासनाने ३ हजार ५ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले. यापैकी पालिका प्रशासनाने आतापर्यंत १ हजार ३९३ शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरात सुरू असलेल्या वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामावर आतापर्यंत ३ कोटी १५ लाख ७८ हजार रूपयांचा खर्च अनुदानापोटी करण्यात आला आहे. सध्या शौचालयाचे काम ६५ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे.नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरात जुलै २०१५ पासून शौचालय निर्मितीचे काम हाती घेण्यात आले. शौचालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील सर्वच वार्डांमध्ये फिरून किती कुटुंबधारकांकडे शौचालय आहेत, किती कुटुंबाकडे शौचालय नाही, याबाबतचे सर्वेक्षण केले. त्यानंतर शौचालय नसणाऱ्या कुटुंब प्रमुखांना नगर पालिका कार्यालयात अर्ज दाखल करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. वैयक्तिक शौचालयाच्या लाभासाठी गडचिरोली शहरातून आतापर्यंत एकूण २ हजार ८०८ लाभार्थ्यांचे अर्ज पालिका प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी पालिका प्रशासनाने २ हजार २७० शौचालय मंजूर केले आहेत. मंजुरपैकी १ हजार ३९३ शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे. प्राप्त अर्जापैकी त्रुट्या आढळलेले २६४ अर्ज रद्द करण्यात आले आहे. ९०० शौचालयाचे काम अपूर्ण असून ते सुरू आहे. लाभार्थ्यांना शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यासाठी अग्रीम स्वरूपात पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम प्रत्येकी सहा रूपये अदा करण्यात आली आहे. पालिकेला शौचालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकारकडून १२ हजार रूपये अनुदान देय आहे. एवढ्या रक्कमेत शौचालयाचे बांधकाम शक्य नसल्याची बाब लक्षात आल्यावर पालिका प्रशासनाने आपल्या स्तरावरून लाभार्थ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिका प्रशासनातर्फे शौचालय लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये अनुदान दिले जात आहे. केंद्र सरकार व पालिका प्रशासन मिळून लाभार्थ्यांना एकूण १७ हजार रूपयांचे अनुदान दिले जात आहे. संबंधित लाभार्थ्याने काम पूर्ण झालेल्या शौचालयाचे फोटो सादर केल्यानंतर पडताळणीची कार्यवाही केली जात आहे. त्यानंतर अहवाल प्राप्त होताच पालिका प्रशासनातर्फे संबंधित लाभार्थ्यांना शिल्लक अनुदान दिले जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)काम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई होणारगडचिरोली नगर पालिका प्रशासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या २ हजार २७० शौचालयांपैकी पाच ते सहा शौचालयाचे काम संबंधित लाभार्थ्यांनी अद्यापही सुरू केले नाही, असे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिसून आले. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याचे अनुदान घेतले आहे. अशा लाभार्थ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी दिला आहे.१०० टक्के काम करण्याचे न.प. समोर आव्हानवैयक्तिक शौचालयाचे बांधकाम मंजूर झालेल्या संबंधित लाभार्थ्याने शौचालयाचे काम विहीत वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित लाभार्थ्यांना नगर पालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. शासनाने गडचिरोली शहरातील मंजूर शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत दिली आहे. येत्या पाच दिवसात शहरातील सर्वच शौचालयाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. त्या दिशेने पालिका प्रशासन गतीने प्रयत्न करीत आहे.१४ व्या वित्त आयोगाचा निधी वापरता येणारन.प. प्रशासनाने शौचालय बांधकामासाठी २ हजार २७० लाभार्थ्यांना ६ हजार प्रमाणे पहिला हप्ता दिला. १ हजार ९१४ लाभार्थ्यांना ५ हजार प्रमाणे ९५ लाख ७० हजार रूपयांचे अनुदान दिले. त्यानंतर १ हजार ३९३ लाभार्थ्यांना ६ हजार प्रमाणे तिसऱ्या हप्त्याचे अनुदान दिले. शासनाकडून प्राप्त झालेला निधी संपल्यास चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेला निधी शौचालय अनुदानावर पालिकेला खर्च करता येणार आहे.५७ लाभार्थी लेटलतीफन.प. प्रशासनाच्या वतीने शौचालय बांधकामाबाबत सुरूवातीपासूनच जनजागृती केली जात आहे. शिवाय उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होत आहे. या कारवाईचा धसका घेऊन शहरातील ५७ कुटुंबधारकांनी शौचालयासाठी पालिका कार्यालयात येऊन गुरूवारी अर्ज दाखल केले.