या योजनेच्या वैशिष्ट्यानुसार म्हणजे गडचिराेली जिल्ह्यातील कृषिपंप धारकांकडून भरल्या गेलेल्या या कृषिपंप वीजबिलाच्या ३० लाख ८८ हजारांच्या रक्कमेतून ३३ टक्के म्हणजे १० लाख १९ हजार हे कृषी ग्राहकांच्या संबंधित गावाच्या मुलभूत सुविधांसाठी उपलब्ध होणार आहे. ३३ टक्के म्हणजे १० लाख ७२ हजार असे हे कृषी ग्राहकांच्या जिल्ह्यातील म्हणजे गडचिराेली जिल्ह्यातील मुलभूत सुविधांसाठी उपलब्ध होणार आहेत.
कृषिपंप धारक हरिकुमार व्यंकटेश्वर येनगंट्टी यांनी आपल्याकडील ६ विद्युत बिलांचे एकूण २ लाख २६ हजार ३६० रूपये भरणा करुन थकबाकीमुक्त झाले. तसेच रांजना वेंकय्या शेट्टी यांनी आपल्याकडील ६ विद्युत बिलांचे एकूण १ लाख ७८ हजार रूपये भरणा करुन थकबाकी मुक्त झाले. त्यांचा शाल व श्रीफळ देऊन उपकार्यकारी अभियंता सि. यु. सडमेक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कृषिऊर्जा पर्व अंतर्गत आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील ७ हजार २६२ कृषी ग्राहकांनी ६ कोटी २८ लाखांचा भरणा केला आहे.
जिल्ह्यातील ३ हजार ८१२ थकबाकी मुक्त झालेल्या कृषिपंप धारकांपैकी एकंदरीत ३ हजार ३१२ कृषिपंप धारकांना थकबाकी मुक्त झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.
सिरोंचा उपविभागीय कार्यालय येथे चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता आर. के. गाडगे, आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता पी. पी. मेश्राम यांच्या मार्गदर्शनात कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० नुसार महाकृषी ऊर्जा पर्व मोहीम अंतर्गत कृषिपंप धारकांना कृषी योजना २०२० बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच उत्कृष्ट काम करणारे वीज कर्मचारी ताहिर अब्दुल सत्तार शेख यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सदर मोहिमेत उपकार्यकारी अभियंता सी. यू. सडमेक, कनिष्ठ अभियंता एम. आय. मेश्राम, लिपिक राकेश गेडाम,कंत्राटी कर्मचारी दिनेश तोटावार सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग केला.
या ऊर्जा पर्व अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १५१ ग्रामसभा घेण्यात आल्या. ४१३ कृषी मेळावे, ७ सायकल रॅली, ६५ बांधावर महावितरणचे अधिकारी यांनी जाऊन-कॅपॅसिटरचा वापरामुळे कृषिपंपाना योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळणे, कृषिपंप हाताळताना घेण्यात येणारी खबरदारी, वीज सुरक्षा याबाबत प्रबोधन केले.