शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

विकासासाठी आसुसली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 1:01 AM

आदिवासीबहुल, दुर्गम क्षेत्रासोबतच नक्षलवादाने ग्रासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाला भरपूर वाव आहे. मात्र जिल्ह्याबाहेरील नागरिकांमध्ये या जिल्ह्याविषयी असलेला गैरसमज आणि पर्यटनाला वाव देण्यासाठी योग्य मार्केटिंगचा अभाव यामुळे या पर्यटनस्थळांचा हवा तसा विकास अद्याप झालेला नाही.

ठळक मुद्देकेवळ एक स्थळ ‘क’ वर्गात : यावर्षी सोयीसुविधांसाठी ५ कोटींचा निधी खर्च करणार

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासीबहुल, दुर्गम क्षेत्रासोबतच नक्षलवादाने ग्रासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाला भरपूर वाव आहे. मात्र जिल्ह्याबाहेरील नागरिकांमध्ये या जिल्ह्याविषयी असलेला गैरसमज आणि पर्यटनाला वाव देण्यासाठी योग्य मार्केटिंगचा अभाव यामुळे या पर्यटनस्थळांचा हवा तसा विकास अद्याप झालेला नाही. परिणामी नक्षली कारवाया नियंत्रणात असल्या तरी पर्यटकांना या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे आकर्षित करण्यात प्रशासनाला अपेक्षित यश आलेले नाही.जिल्ह्यातील पुरातन मंदिरांपैकी मार्र्कंडा येथील मार्र्कंडेश्वराचे मंदिर ब वर्ग पर्यटनस्थळात आहे. याशिवाय इतर ३२ स्थळे क वर्ग पर्यटनस्थळाच्या यादीत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात (२०१७-१८) मध्ये जिल्ह्यातील या पर्यटनस्थळांवर सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून काही ठिकाणी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. याशिवाय चालू आर्थिक वर्षात जवळपास ५ कोटी खर्च करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.मार्कंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. त्या ठिकाणी टॅक्सी पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, निरीक्षण मनोरा, नदी किनाऱ्याचा विकास, सुलभ शौचालय, बंद गटार फुटपाथ व नदीमध्ये साकव आदी कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय पोचमार्गाचे बांधकाम, रिसॉर्ट/कॉटेज इमारत, जाहीरात पोर्टल, गेट व सुरक्षा कक्ष बांधकाम आणि पाण्यातील खेळ व नौकाविहाराची सुविधा होणार आहेत.आरमोरी तालुक्यातील वैरागडचा किल्ला, डोंगररांगांनी वेढलेले निसर्गरम्य देऊळगाव, डोंगरावर असलेले खोब्रामेंढाचे मारूती मंदीर, अहेरी तालुक्यातील व्यंकटापूरचे बालाजी मंदीर, महाभारताचा संदर्भ असलेले लख्खामेढा, कोरची तालुक्यातील गोंड राजा पुरमशहाचे टिप्पागड, महादेवाच्या शिवलिंगासाठी धानोरा तालुक्यातील भवरागड, आदिवासी लोकांचे आराध्य दैवत झाडापापडा, गोदावरी व इंद्रावती नद्यांचा संगम असलेले सिरोंचा तालुक्यातील सोमनूर, दर बारा वर्षांनी भरणाºया पुष्कर यात्रेचे स्थळ नगरम, हैदरशहा दर्गा, चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्य, क्रांतीकारी वीज बाबूराव शेडमाके यांचे स्मारक असलेले घोट, आपापल्लीचे वनवैभव, भामरागड, सुरजागड, मुलचेराचे बौद्ध स्तूप, सेमाना मंदीर, कुरखेडाचे कृषी पर्यटन केंद्र ही स्थळे आकर्षण आहेत.कमलापूर पर्यटनस्थळासाठी प्रयत्न करणार-पालकमंत्रीअहेरी तालुक्याच्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पची अजूनही शासनाकडे पर्यटनस्थळ म्हणून नोंद नाही. ते पर्यटकनस्थळ घोषित करण्याकरिता आपण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व अधिकाºयांशी चर्चा करणार. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा प्राधान्याने मांडून पर्यटनस्थळ घोषित होण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन वनराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी कमलापूूर येथील शिष्टमंडळाला दिले. कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये महावत व चाराकटरची रिक्तपदे भरण्याकरिता कार्यवाही व्हावी, यासाठीही पुढाकार घेणार, असे पालकमंत्री आत्राम यांनी शिष्टमंडळातील युवकांशी बोलताना सांगितले.वनकायद्याच्या कचाट्यात रखडला विकासजिल्ह्याचा ७६ टक्के भूभाग वनांनी आच्छादला आहे. त्यामुळे बहुतांश पर्यटनस्थळांच्या विकासासाठी वनकायद्याचे पालन करावे लागत आहे. याशिवाय नक्षलग्रस्त जिल्हा ही प्रतिमाही चिकटलेली आहे. त्यामुळे पर्यटकांना या पर्यटनस्थळांकडे खेचून आणण्यासाठी प्रशासनाला प्रामाणिक प्रयत्नांसोबत योग्य पद्धतीने मार्केटिंग करावे लागणार आहे. पर्यटकांचा ओघ जिल्ह्याकडे वाढल्यास या जिल्ह्याच्या बाबतीत असलेला गैरसमज दूर होण्यासोबतच रोजगार निर्मितीलाही मदत होणार आहे.

टॅग्स :tourismपर्यटन