गडचिराेली : काेराेना लाॅकडाऊनमुळे नाट्यगृह, सिनेमागृह बंद असल्याने विशेषत: या क्षेत्रातील लाेककलावंत व नाट्य कलावंतांचा राेजगार हिरावला. उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय न राहिल्याने सध्या अनेकजण पारंपरिक केशकर्तन, भाजीपाला विक्री तसेच मेडिकलद्वारे औषध विक्री व्यवसाय करीत आहेत. राज्य सरकारने अलीकडेच लाेककलावंतांना पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली. परंतु यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत यादी तयार करण्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही.
बाॅक्स ......
मदत हातात किती उरणार?
लाेककलावंतांना पाच हजाराच्या बदल्यात दहा कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत. हे काम संचामार्फत केले जाणार असल्याने प्रत्येक संचात किती कलावंत राहणार त्यानुसार मदतीचे वाटप हाेणार आहे. प्रत्येक संचात किमान आठ ते दहा लाेकांचा समावेश राहू शकताे. अशावेळी वाहनखर्च वगळता मदत किती उरणार?
बाॅक्स ....
राज्य सरकारची मदत कधी मिळणार?
जिल्ह्यातील लाेककलावंतांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याने यादी पूर्ण झाल्याशिवाय व त्या यादीची छाननी झाल्याशिवाय मदत वितरित केली जाणार नाही.
लाेककलावंतांना पाच हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. परंतु याबदल्यात त्यांच्या संचाला जनजागृतीचे किमान दहा कार्यक्रम करावे लागणार आहेत.
गडचिराेली जिल्ह्यात बहुसंख्य लाेककलावंत आहेत. त्यामुळे लाेककलावंतांची यादी तयार केल्यानंतरच त्यांच्या कामानुसार मदत दिली जाणार आहे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीची कलावंतांना प्रतीक्षाच आहे.
बाॅक्स ......
यादी बनविण्याचे काम सुरू
जिल्ह्यात झाडीपट्टी रंगभूमीचा व्याप असल्याने लाेककलावंतही भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे प्रशासनामार्फत यादी बनविण्याचे काम सुरू आहे. अंतिम यादी तयार करून नावाची छाननी केल्यानंतरच लाेककलावंतांची संख्या निश्चित हाेणार आहे. यादी तयार झाल्यानंतर कलावंतांना कार्यक्रम करण्याची परवानगी दिली जाईल.
काेट ....
लाेककलावंत व नाट्य कलावंतांची फरफट
दिवाळी ते हाेळी सणापर्यंत चार महिने नाट्य कलावंतांना राेजगार मिळताे. परंतु दीड वर्षापासून काेराेनामुळे नाटक सादर करणे बंद असल्याने कलावंतांना आर्थिक अडचण जाणवत आहे.
- ज्ञानेश्वरी कापगते, कलावंत
झाडीपट्टीतील नाटके रंगमंचावर सादर करण्याची शासनाने परवानगी द्यावी तसेच रंगकर्मींसाठी रंगकर्मी राेजगार हमी याेजना सुरू करावी. यापूर्वी शासनाला दिलेल्या निवेदनाचा विचार करावा.
- अनिरुद्ध वनकर, अध्यक्ष, झाडीपट्टी मंडळ
नाट्यप्रयाेग सादर करणे बंद असल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरभाडे, वीज बिल भरण्यासह अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कलावंतांची आर्थिक घडी विस्कटली.
मुस्ताक शेख,
कलावंत