पर्यटकांसाठी मेजवाणीच : आदिवासींच्या विविध कलांचीही जपवणूक गडचिरोली : गडचिरोली हा राज्यातला सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या नागरिकांनी अनेक मोठे वृक्ष जपून ठेवले आहेत. या ऐतिहासिक वारस्याला कालांतराने वन विभागाच्या मदतीने संग्रहालयात ठेवून त्याची आजही जपणूक केली जात आहे. या जिल्ह्यातील वनसंपदेचे वैभव सांगणारे अनेक संग्रहालय जिल्ह्यात दिमाखाने उभे आहेत. या जिल्ह्यातील नैसर्गिक वनौषधी व जंगलातून उत्पन्न होणारे साहित्य याचीही माहिती वन विभागाच्या अनेक संग्रहालयात नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. आलापल्ली, गडचिरोली येथील संग्रहालय या सर्वांची साक्ष देतात.आलापल्ली हे वन विभागाचे अगदी सुरूवातीपासूनच केंद्रबिंदू राहिले आहे. या ठिकाणी इंग्रजांच्या काळात लाकूड कापण्यासाठी मशीनचा वापर केला जात होता. या ठिकाणच्या परिसराला कक्रचालय म्हणून ओळखले जात होेते. नवीन तंत्राज्ञानाबरोबरच क्रकचालयातील मशीनचा वापर बंद पडला. या मशीनच्या आठवणी जपण्याच्या उद्देशाने या मशीनचे सुटे भाग व त्या कालावधीत वापरण्यात येणाऱ्या इतरही वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. या संग्रहालयाचे उद्घाटन १७ मे २०१४ रोजी तत्कालीन वन विभागाचे प्रधानसचिव प्रवीण परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी संस्कृती व वन विभागाबाबत सविस्तर माहिती देणारे एकमेव संग्रहालय आहे. या परिसरात येणारे अनेक पर्यटक, वन विभागाचे अधिकारी, आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक व इतिहासकार या संग्रहालयाला आवर्जून भेट देतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच गर्दी असल्याचे बघायला मिळते. भामरागड मार्गावर ग्लोरी आॅफ फॉरेस्ट तर गडचिरोली शहरात पोटेगाव मार्गावर गोंडवाना कला दालन तसेच सेमाना येथे उभारण्यात आलेल्या संकुलात गडचिरोली जिल्ह्याच्या वन्य प्राणी व जंगलाची माहिती देणारे प्रदर्शन नेहमीच आकर्षनाचा केंद्रबिंदू ठरले.ग्लोरी आॅफ फॉरेस्ट आलापल्लीआलापल्ली वन विभागात दोन सागवान वृक्ष राम व लक्ष्मण नावाने प्रसिद्ध आहे. त्यापैकी राम नावाचे वृक्ष १९६२ मध्ये कोसळले. १९६० च्या दशकात तत्कालीन उपवनसंरक्षक एस. एम. बुटा यांनी या वृक्षाचे नामकरण केले. आलापल्ली- भामरागड मार्गावरील तलवाडा गावापासून जंगलात दक्षिण दिशेकडे सात किमी अंतरावर हे वृक्ष आहेत. राम वृक्ष हे बल्हारशहा आगारात पर्यटकांसाठी सुरक्षित ठेवले आहे. १९५३ मध्ये वन वैभवाची स्थापना करण्यात आली.
संग्रहालयातून जोपासली काष्ठशिल्पाची परंपरा
By admin | Published: May 18, 2016 1:35 AM