शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

रेल्वेच्या निर्माणाधीन कामामुळे वाहतूक प्रभावित

By admin | Published: July 03, 2016 1:24 AM

गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थान असलेल्या वडसा रेल्वेस्थानकावर दुसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुरू असल्याने ...

अडचण : रेल्वे स्थानकावरील बांधकाम साहित्य आणणाऱ्या रेल्वेगाड्याही वाढल्यादेसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थान असलेल्या वडसा रेल्वेस्थानकावर दुसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुरू असल्याने तासागणिक रेल्वे फाटक बंद होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी मागील पाच वर्षांपासून भूमिगत रेल्वे पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली. परंतु भूमिगत पुलाच्या कामाची गती अतिशय मंद असून भूमिगत पुलाचा प्रश्न अधांतरीत आहे. या वर्षात देसाईगंज रेल्वेस्थानकावर अनेक सोयीसुविधा मंजूर झाले आहेत. यामध्ये विश्रामगृहाजवळील मागील पुलाचे बांधकाम, नवीन प्लॉटफार्म, रेल्वेपटरीचे विस्तारीकरणासाठी माती, दगड, मुरूम याचा भराव टाकण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे अनेक वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच नवीन प्रस्तावित रेल्वे पटरीचे काम सुरू असल्याने याकरिताही लोहापासून गिट्टीपर्यंत सर्वच रेल्वेने आणण्यात येत आहे. त्यामुळे दिवसा अनेक रेल्वे गाड्या येतात. दिवसाला २५ ते ३० वेळा रेल्वे फाटक बंद होते. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. हे शहर रेल्वे मार्गामुळे दोन भागात विभागले आहे. बाजारपेठ, शाळा, कॉलेज पेट्रोल या साऱ्या बाबी एका बाजुला आहे. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या बाजुला जाण्यासाठी तसेच विद्यार्थी व विद्यार्थ्यांनाही ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. रोजच वाहतूक प्रभावित होत असून रेल्वे विभागाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. या ठिकाणी नागरिकांची होत असलेली कसरत पाहण्यासारखी आहे. येथे यापूर्वी अनेक अपघातही होतात. वाहतूक सुरळीत होण्यासाठी रेल्वे विभागाने सुरक्षा गार्ड तैनात करावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)