देसाईगंज हे शहर मोठी बाजारपेठ असून दिवसेंदिवस शहरात वाहनांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जवळपासच सर्वच जिल्ह्यांच्या सीमा लागून असल्याने वाहनांच्या वर्दळीची संख्या मोठीच आहे. चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या शहरासाठी एसटीचे स्वतंत्र बसस्थानक नाही. बसस्थानकांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मागील बाजूकडील जागा खरेदी केली आहे. मात्र, बांधकामासाठी निधी दिला नाही.
आरमाेरी मार्गावर गडचिरोली, ब्रम्हपुरी आगारांच्या बसेस येतात व थांबतात. बसचालक व्यवस्थित रस्त्या कडेला न लावल्या जात नाही. या परिसरात अतिक्रमण वाढले आहे. ये-जा करणाऱ्या वाहनांना वाहतुकीसाठी रस्ताच शिल्लक नसतो. एकाच वेळेला रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसेस लागल्या तर वाहतुकीसाठी रस्ताच उरत नाही. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. तसेच या बसेस रस्त्यावरच लागून असल्याकारणाने बाजार परिसरातून येणाऱ्या वाहनधारकांना समोरचे वाहने न दिसल्यामुळे आजवर अनेक लहान-मोठे अपघातही झालेले आहेत. शहराची वाढती लोकसंख्या, वाहनांची मोठ्या प्रमाणात रस्त्यावरची वर्दळ होणारी वाहतुकीची कोंडी यासाठी प्रस्तावित जागेवर लवकरात लवकर बसस्थानकाचे काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
240921\img_20210819_164041.jpg
बसेसच्या अशा व्यवस्थित न लावल्याने अशी होते वाहतुकीची कोंडी.