लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वादळी पावसाने एटापल्ली-आलापल्ली मार्गावर मोठा झाड कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दीड तास बंद होती. दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.गडचिरोली शहरातही पाऊस बरसल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. गेल्या २४ तासात संपूर्ण जिल्हाभरात ३०.९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. जिल्हाभरात आतापर्यंत एकूण ३३३ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील तीन सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. यामध्ये जिमलगट्टा येथे ६५.४ मिमी, सिरोंचा ६५.४ व बामणी परिसरात १०८.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात गुरूवारी रात्रीपासून शुक्रवारी दुपारपर्यंत पाऊस बरसला. पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले आहे. पावसामुळे धान पिकाच्या रोवणीस काही भागात वेगही आला आहे. पावसामुळे बऱ्याच गावातील नाल्या तुडूंब भरून वाहत होत्या. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या संततधार पावसाने गडचिरोलीच्या बाजारपेठेत आलेल्या अनेक नागरिकांनी दुकानाचा आसरा घेतला.
झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 1:05 AM
गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वादळी पावसाने एटापल्ली-आलापल्ली मार्गावर मोठा झाड कोसळला.
ठळक मुद्देपावसाचा फटका : एटापल्ली-आलापल्ली मार्गावर वाहनांच्या रांगा