लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : आसरअल्ली या महामार्गावर सिरोंचापासून ८ किमी अंतरावर आरडा गावापासून शेकडो अवजड ट्रकांची रांग रस्त्यावर राहत असल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलीस व परिवहन विभागाने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.सिरोंचा- आसरअल्ली या महामार्गावर सिरोंचापासून ८ किमी मार्गावर आरडा गावाकडे जाणारा फाटा पडतो. गावातील रस्ते अरूंद असल्यामुळे व रेतीघाटावर ट्रकांसाठी जागा नसल्याने आरडा गावाजवळील महामार्गावर ट्रकांची रांग लावलेली असते. अनेक ट्रक गावातून रेती घाटावर नेऊन रेती भरून परत महामार्गावर आणत पर्यंत इतर ट्रकांची रांग लागलेली असते. सदर रांग पुन्हा रस्त्यावर असते. संपूर्ण रस्ता ट्रकांनी व्यापला असतो. या मार्गावर दररोज एसटी महामंडळाच्या बसेस, खासगी वाहतुकीची साधने, दुचाकी, चारचाकी वाहने दररोज ये- जा करीत असतात. त्यातच रस्ता ट्रकने व्यापलेला राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. परिणामी येथे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे रस्त्यावर ट्रक उभे करण्याची परवानगी कोणत्या विभागाने दिली, असा सवाल आरडा येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.
ट्रकांमुळे वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:02 AM
आसरअल्ली या महामार्गावर सिरोंचापासून ८ किमी अंतरावर आरडा गावापासून शेकडो अवजड ट्रकांची रांग रस्त्यावर राहत असल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देअपघाताची शक्यता : आरडा मार्गावर शेकडो वाहनांची रांग