शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:25 AM

धानोरा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले; परंतु जिल्ह्यातील ग्रामीण ...

धानोरा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले; परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

विद्युत केंद्रांअभावी पुरवठ्याची समस्या

सिरोंचा : अतिदुर्गम व ग्रामीण भागांतील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होतो. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. परिणामी नवीन ३३ के. व्ही. उपकेंद्र निर्मितीची मागणी आहे. वीजसमस्या साेडविण्यासाठी केंद्र निर्माण करावे.

खर्रा पन्नीवर बंदी आणा

जोगीसाखरा : जोगीसाखरा गावासह आरमोरी तालुक्यात खर्रा घोटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पन्नीचा वापर केला जातो. या पन्न्या रस्त्यावर फेकून दिल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

दिभना मार्ग अरुंदच

गडचिरोली : वननाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे. मागील अनेक वर्षांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी केली जात आहे.

वडधात अनियमित वीज

वडधा : येथे मागील आठ दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे व्यावसायिक व नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.

अनेक शाळा विजेविनाच

कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळ खात पडून आहे. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच आहेत.

वन जमिनीवर अतिक्रमण

आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वन विभागांत अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी हाेत आहे.

स्वच्छतागृहांचा अभाव

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गाक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीअभावी गैरसोय सहन करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतागृह उभारावे.

देसाईगंजात वाढले डास

देसाईगंज : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून अनेक आजार पसरत आहेत. म्हणून डास निर्मूलनासाठी जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी होत आहे. डासांमुळे विविध आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मंद इंटरनेटचा त्रास

कुरुड : परिसरात बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचे इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिले जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जीप्रमाणे दिली जात आहे.

पशू विभागातील पदे रिक्त

एटापल्ली : पशुवैद्यकीय विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जनावरांवर वेळीच उपचार होण्यास अडथळे निर्माण होत आहे. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यांत कर्मचारी उपलब्ध नसल्याने शिपाईच कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे पशू विभागातील रिक्त पदे लवकर भरावीत, अशी मागणी हाेत आहे.

रेखेगाव मार्ग खड्ड्यात

घोट : परिसरातील घोट-रेखेगाव मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोट हे मोठे गाव असल्याने या गावाकडे रेखेगाव येथील नागरिक विविध कामांसाठी येतात. सदर मार्ग खराब असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. मार्गावर अनेक अपघात झाले आहेत.

वाहतुकीस येत आहे अडसर

कुरखेडा : कुरखेडा शहराच्या अनेक वॉर्डांतील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगर पंचायत प्रशासन रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

कुंभीजवळ पूल बांधा

गडचिरोली : कुंभी गावाजवळील पोटफोडी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. पावसाळ्यात या पुलावर पाणी येत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. येथे उंच पुलाचे बांधकाम केल्यास पावसाळ्यातील समस्या सुटू शकते. त्यासाठी उंच पूल बांधावा.

शेतीसाठी झुडपी जंगल द्या

गडचिरोली : काही तालुक्यांमध्ये झुडपी जंगल आहे. हे जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही. शेती तोट्याचा व्यवसाय ठरत आहे.

इमारतीची दुरवस्था

अहेरी : तालुक्यातील आलापल्लीनजीक असलेल्या नागेपल्ली येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस स्थितीत आहे. लाखो रुपये खर्चून सदर इमारत बांधण्यात आली. मागील १० वर्षांपासून या इमारतीकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या ही इमारत बेवारस आहे.

कोल्हापुरी बंधारे जीर्ण

धानोरा : सिंचन विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत.

रेगुंठात फोर-जी सेवा द्या

सिरोंचा : तालुक्यात रेगुंठा परिसरात भ्रमणध्वनी मनोरा नसल्याने, ग्राहकांना तेलंगणा राज्यातील नेटवर्कवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे रेगुंठा येथे बीएसएनएलचे मनोरे उभारून फोर-जी सेवा सुरू करावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.

मच्छरदाणी पुरवा

अंकिसा : सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा, आसरअल्ली परिसरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून डासांचे प्रमाण वाढले आहे. साथीच्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी या भागात प्रशासनाने डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करून नागरिकांना मच्छरदाणीचे वाटप करावे, अशी मागणी हाेत आहे.