लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : पीक कर्ज कसे घ्यावे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी धानोरा तालुक्यातील कृषी मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले.शेतकरी शेतीच्या मशागतीची करिता लागणारा खर्च भागविण्यासाठी आपल्याजवळ असलेल्या पैशासोबतच विविध ठिकाणाहून कर्ज घेऊन आपल्या शेतीची मशागत करतात. जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँकेमधून पीक कर्ज घेऊन शेतीची मशागत करत असतात. परंतु बरेच वेळा पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून पीक कर्ज घेण्याकरिता शेतकऱ्यांनी समोर यावे. कृषी मित्रांनी त्यांच्या गावात असलेल्या शेतकऱ्यांना माहिती प्रदान करावी. याकरिता कृषी मित्रांना ऑनलाईन पद्धतीने सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये ऑनलाईन पीक अर्ज कसा भरावा, कोणकोणते कागदपत्रे अर्जार्सोबत जोडून अर्ज कसा सादर करायचा यासाठी सविस्तर असे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये तालुक्यातील कार्यरत कृषी मित्रांनी सहभाग घेऊन आपापल्या क्षेत्रांमध्ये काम करण्याचे आश्वासन दिले.या प्रशिक्षणाकरिता तालुक्याचे गट विकास अधिकारी बी. वाय. निमसरकार, तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, कृषी अधिकारी शिवाजी खटके, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे यांच्यासह धानोरा कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
पीक कजार्बाबत कृषी मित्रांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 5:00 AM
पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून पीक कर्ज घेण्याकरिता शेतकऱ्यांनी समोर यावे. कृषी मित्रांनी त्यांच्या गावात असलेल्या शेतकऱ्यांना माहिती प्रदान करावी. याकरिता कृषी मित्रांना ऑनलाईन पद्धतीने सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये ऑनलाईन पीक अर्ज कसा भरावा, कोणकोणते कागदपत्रे अर्जार्सोबत जोडून अर्ज कसा सादर करायचा यासाठी सविस्तर असे प्रशिक्षण देण्यात आले.
ठळक मुद्दे धानोरात मार्गदर्शन : कर्जाचे अर्ज कसे भरावे याबाबत शेतकऱ्यांना देणार सल्ला