शिवणीत उपक्रम : नागपूर कृषी महाविद्यालयाचा पुढाकार आरमोरी : कृषी महाविद्यालय नागपूर यांच्या वतीने आरमोरी तालुक्यातील नरेश माकडे यांच्या शेतावर चारापीक (बरसीम पीक) लागवडीचे प्रशिक्षण शनिवारी देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान जैव तंत्रज्ञान विभागाचे सहप्रकल्प अन्वेशक डॉ. आर. एम. झिंजर्डे यांनी भेट दिली. चारापीक लागवडीबाबत पशुपालकांना मार्गदर्शन केले. बरसीम पीक हे दुधाळ जनावरांना खाऊ घातल्याने दुधात २० टक्के वाढ होते. तसेच जनावरांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. बरसीम पीक लागवडीचा खर्च अत्यंत कमी येतो, अशी माहिती दिली. डॉ. व्ही. जे. अतकरे यांनी शेतकऱ्यांनी दूध उत्पादन वाढीसाठी बरसीम पिकाची लागवड करावी, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शिवणी येथील प्रगतशील शेतकरी युवराज ठाकरे, प्रीती देशमुख, वासुदेव निकुरे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
चारापीक लागवडीचे प्रशिक्षण
By admin | Published: March 22, 2017 2:19 AM