कोरची तालुक्यातील बोडेना, साल्हे, भर्रीटोला आदी गावांचा समावेश असेलेले रावपाट गंगाराम घाट वनधन विकास केंद्र, दोडके व अस्वलहुडकी गावातील दंतेशिरो वनधन विकास केंद्र, गहानेगाटा गावातील कुवारपाट वनधन विकास केंद्र व कुकडेल या गावातील समसेरगड वनधन विकास केंद्र आदी ४ केंद्रांचा यात समावेश होता.
योजनेची अंमलबजावणी महाग्रामसभा कोरची, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, गडचिरोली यांच्याकडून होत आहे. आदिवासी उद्योगाचे मूल्यवर्धन, वन उत्पादनाचे ब्रांडिंग व बाजारपेठ हा उद्देश समाेर ठेवून उद्योजकता आणि कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत हे प्रशिक्षण देण्यात आले. लोकपंचायत संस्था, संगमनेर येथून आलेल्या प्रशिक्षकांनी या भागात असलेले गौण वनाेपज ते त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग याविषयी सांगितले.
गडचिरोली भागात मोह, टोळ, हिरडा, बेहडा, चारोळी आदी गौण वनाेपज मुबलक प्रमाणात असून येथील आदिवासींची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. या गौण वनाेपजावर वनधन केंद्रामार्फत प्रक्रिया करून चांगल्या प्रकारे उद्योग निर्मिती होऊ शकते, असे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात वनधन विकास केंद्राचे सदस्य उपस्थित हाेते.