ऑनलाइन प्रशिक्षणात शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यामधील उद्योगाची संधी, शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबड्यांच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतिबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्त्वाचे महत्त्व, संसर्गजन्य रोग व त्यावरील उपचार, तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याबाबतचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी आदी विषयांवर विशेष तज्ज्ञ शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या संकेतस्थळावर २८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आयाेजकांनी कळविले आहे.
शेळी, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:39 AM