प्रशिक्षण वर्गात देसाईगंज तालुका संपर्क अधिकारी कुणाल कोवे, प्रशिक्षण संस्थेचे विषय सहायक संजय बिडवाईकर, केंद्रप्रमुख विवेक बुद्धे, संजय कसबे, सुलभक देवचंद मस्के व जैमिना लाडे उपस्थित होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून ‘फुलोरा’ या उपक्रमाचा जिल्ह्यात जन्म झाला. क्रमिक अभ्यासक्रम अभ्यासूनदेखील बरेच विद्यार्थी अप्रगत आहेत. अप्रगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी सदर उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमात सहभागी होणे हे ऐच्छिक आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याची कालबद्ध वेळ ठरवून दिलेली असल्याने याकरिता शिक्षकांनी स्वतःला झोकून देण्याचे आवाहन प्राचार्य पाटील यांनी प्रशिक्षणार्थी अध्यापकांना उद्देशून भेटीदरम्यान केले. दरम्यान, कुणाल कोवे यांनीही मार्गदर्शन केले. तत्पूर्वी सकाळी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी निर्मला कुचीक, गटसमन्वयक विजय बन्सोड, केंद्रप्रमुख विवेक बुद्धे, संजय कसबे व सुलभक उपस्थित होते. उद्घाटन वर्गाचे संचालन व आभार विषय साधन व्यक्ती राणू ठाकूर यांनी तर प्राचार्य भेटीचे संचालन विषय साधन व्यक्ती अरविंद घुटके व आभार रामकृष्ण रहांगडाले यांनी मानले.
फुलाेरा उपक्रमाबाबत शिक्षकांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:32 AM