ए.एस. वानखेडे गडचिरोलीचे नवीन तहसीलदार नगर प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महसूल विभागाने जिल्ह्यातील सहा तहसीलदारांचे स्थानांतरण करण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर गोंदिया, चंद्रपूर येथे कार्यरत असलेल्या तहसीलदारांना नियुक्ती देण्यात आली आहे. आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे यांची जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे. कोरचीचे तहसीलदार विजय बोरूडे यांचे गोंदिया जिल्ह्यातील देवरीचे तहसीलदार म्हणून स्थानांतरण झाले आहे. गडचिरोलीचे तहसीलदार संतोष विजय खांडरे यांची चंद्रपूरचे तहसीलदार म्हणून स्थानांतरण झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महेंद्र अंबादास सोनोने यांची वर्धा जिल्ह्यातील कारंजाचे तहसीलदार म्हणून स्थानांतरण झाले आहे. सिरोंचाचे अतिरिक्त तहसीलदार अशोक चंद्रभान कुमरे यांची आयुक्त कार्यालयात बदली झाली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयात खरेदी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले यशवंत तुळशिराम धाईत यांची बदली आरमोरीचे तहसीलदार म्हणून करण्यात आली आहे.चंद्रपूर येथील तहसीलदार ए. एस. वानखेडे यांची नेमणूक गडचिरोलीचे तहसीलदार म्हणून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य विभागात तहसीलदार म्हणूून नागपूर येथील तहसीलदार नारायण मारोतराव ठाकरे यांची नेमणूक झाली आहे. भंडारा जिल्ह्याचे पवनीचे तहसीलदार एस. के. वासनिक यांची नियुक्त जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक पदावर करण्यात आली आहे. कोरचीचे तहसीलदार म्हणून गोंदिया जिल्ह्यातील देवरीचे तहसीलदार संजय नागटीळक यांना नियुक्त करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यासह महसूल विभागाने राज्यातील एकूण ३१ तहसीलदारांच्या विविध ठिकाणी बदल्या केल्या आहेत.
जिल्ह्यातील सहा तहसीलदारांचे स्थानांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2017 1:22 AM