लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : मे महिन्यातील वाढत्या तापमानात काही विशिष्ट ठिकाणचे पाण्याचे स्त्रोत कायम राहत असतात. नेमकी हीच संधी हेरून शिकार करणारे लोक त्या ठिकाणी सापळे रचून या महिन्यात विविध प्रजातींच्या पक्षांची मोठ्या प्रमाणात शिकार करतात. पक्षांच्या शिकारीसाठी वैरागड भागात अनेक ठिकाणी सापळे लावण्यात आले आहे. या प्रकारामुळे पक्षांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहेत.आरमोरी वन परिक्षेत्रातील मेंढेबोडी, वैरागड व परिसरातील अनेक गावात हारावत, तितीर, लावा व इतर प्रजातीच्या पक्ष्यांची शिकार केली जाते. सुकाळापासून मेंढेबोडी ते वैरागडच्या चक्करडोहापर्यंतचा जो वैलोचना नदीचा पात्र आहे. या नदी पात्रात ठिकठिकाणी शिकार करणारे लोक सापळे रचून पक्षाची शिकार करीत असल्याचे दिसून येत आहे. हारावत व इतर पक्ष्यांची शिकार करून मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. नदी पात्र, तलाव बोडी या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत असतात. अशा ठिकाणी जाळे पसरविण्यात येते आणि शिकारी स्वत: दबा धरून बसण्यासाठी पाणवठ्याच्या बाजुला झाडाच्या फांद्याची झोपडी तयार करतात. पसरविलेल्या जाळीची दोरी झोपडीपर्यंत पुरवून तहाण भागविण्यासाठी पाणवठ्यावर पक्षी बसल्यावर दबा धरून बसलेला शिकारी जाळीची दोरी ओढतो. यात पक्षी अलगदपणे फासात अडकतो. एकावेळी चार ते पाचच्या संख्येने पक्षी फासात अडकतात. अशा प्रकारच्या विशिष्ट पध्दतीचा अनेक शिकारी पक्ष्यांची शिकार करण्यासाठी वापर करीत आहेत. सध्या तापमान प्रचंड असल्याने अनेक पक्षी प्राणीस्त्रोताच्या ठिकाणी येऊन आपली तहाण भागवित असतात. नेमकी याचवेळी पक्ष्यांची शिकार केली जाते. याबाबत वन विभागाने सतर्क राहून वनातील पशु व पक्ष्यांची शिकार करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वैरागड भागातील नागरिकांनी केली आहे.पक्षी विक्रीचा गोरखधंदा वाढलाआरमोरी तालुक्याच्या वैरागड भागासह जिल्ह्याच्या विविध भागात विविध प्रजातीच्या पक्ष्यांची शिकार करून त्याची विक्री करून पैसे कमवायचे हा गोरखधंदा अनेक शिकारी लोक सर्रास करीत आहेत. शहरी व ग्रामीण भागात फिरून नागरिकांना पक्ष्याची विक्री अनेक लोक करीत असल्यााचे दिसून येत आहे. सायंकाळी व पहाटेच्या सुमारास सापळ्यामध्ये पक्ष्यांना अडवून त्याची शिकार करायची व त्यानंतर गावागावात फिरून चांगल्या किंमतीत पक्षी विकायचे हा गोरखधंदा गेल्या काही दिवसांपासून जोमात सुरू आहे. सदर प्रकाराची वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना परिपूर्ण माहिती आहे. मात्र वन विभागाकडून आतापर्यंत एकाही पक्ष्याची शिकार करणाºयांवर कारवाई करण्यात आली नाही. या गंभीर प्रकाराकडे वनाधिकारी व वनकर्मचारी प्रचंड दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप वैरागड भागातील नागरिकांनी केला आहे. या प्रकाराला वेळीच आळा घालण्याची गरज आहे.
पक्ष्यांच्या शिकारीसाठी पाणवठ्याजवळ सापळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:45 PM
मे महिन्यातील वाढत्या तापमानात काही विशिष्ट ठिकाणचे पाण्याचे स्त्रोत कायम राहत असतात. नेमकी हीच संधी हेरून शिकार करणारे लोक त्या ठिकाणी सापळे रचून या महिन्यात विविध प्रजातींच्या पक्षांची मोठ्या प्रमाणात शिकार करतात. पक्षांच्या शिकारीसाठी वैरागड भागात अनेक ठिकाणी सापळे लावण्यात आले आहे.
ठळक मुद्देवन विभागाचे दुर्लक्ष : पक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर