धानोरा : तालुक्यातील करेमरका येथे मुक्तिपथ अभियानाद्वारे एक दिवशीय गाव पातळीवरील व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून गावातील १८ व्यसनी रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला आहे. शिबिराला भेट दिलेल्या नागरिकांना दारूचे दुष्परिणाम सांगण्यात आले. व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. व्यसनातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. व्यसन कसे लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींबाबत अरुण भोसले यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची माहिती घेतली. शिबिराचे नियोजन तालुका प्रेरक भाष्कर कड्यामी यांनी केले. यशस्वितेसाठी ग्राम अध्यक्ष बाबुराव तुलावी, राहुल तुलावी, विकास तुलावी, आशावर्कर प्रेमीला तुलावी यांनी सहकार्य केले.
करेमरका येथे १८ व्यसनींवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:35 AM