मुलचेरा : तालुक्यातील देवदा येथे मुक्तिपथ अभियानातर्फे एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून एकूण २० रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला. दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या २७ रुग्णांनी शिबिराला भेट दिली. यापैकी ६ रुग्णांना तालुका क्लिनिकला भेट देण्याचे सांगण्यात आले. २१ रुग्णांची नोंदणी करीत २० रुग्णांवर पूर्ण उपचार व औषधोपचार करण्यात आला. अरुण भोसले यांनी रुग्णांचे समुपदेशन केले. शिबीर संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची माहिती घेतली. शिबिराचे नियोजन मुक्तिपथ तालुका प्रेरक आनंद सिडाम यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलीस पाटील माणिक उसेंडी, भूमिया, गाव संघटनेचे प्रमोद कोडापे, सुनील पदा यांनी सहकार्य केले.
देवदा येथे २० रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:24 AM