लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पर्यावरण संवर्धन मानवतावाद, स्त्री-पुरूष समानता, समाजवाद आदी विषयांवर आज चर्चा होत असली तरी या सर्व बाबींची जननी आदिवासी संस्कृती आहे, असे प्रतिपादन आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी केले.रविवारी मूल मार्गावरील लॉनमध्ये मूलनिवासी-आदिवासी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलताना ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी आमदार हिरामन वरखडे, सुखदेव गावळे महाराज, छाया पोटावी, गंगाराम आतला, पुरूषोत्तम निकोडे, हिरा राऊत, प्रा. भगवान नन्नावरे, प्रा. नंदकिशोर रंगारी, रूपेश निमसरकार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना विजय मानकर म्हणाले, संविधानाने आदिवासींना स्वयंकायदा व मालकी हक्क प्रदान केले आहे. त्यामुळे त्यांच्या इलाक्यातील जमीन गैरआदिवासी नागरिकांसाठी दिली जाऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टी संविधान बदलण्याची भाषा करीत असली तरी ते शक्य नाही. संसद कायद्यात फक्तत दुरूस्ती करू शकते. मात्र संविधान बदलू शकत नाही. संविधान बदलविण्याचा अधिकार केवळ संविधान सभेला आहे. आदिवासींची संख्या भारतात सर्वाधिक आहे. न्यूझीलंड, आस्ट्रेलिया यासारख्या आदिवासी बहूल देशांची संस्कृती विकसीत आहे, असे मार्गदर्शन विजय मानकर यांनी केले.माजी आमदार हिरामण वरखडे यांनी मार्गदर्शन करताना वनाधिकार कायदा व पेसा अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यात गडचिरोली जिल्हा राज्यात व देशात आघाडीवर आहे. ग्रामसभांनी त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करून प्रगती साधली आहे. नियोजनबध्द योजनांची अंमलबजावणी केली जात असल्याने गावाचा विकास शक्य झाले आहे. आदिवासी संस्कृती ही समृध्द संस्कृती आहे. युध्द हे सामाजिक वेडेपण आहे. युध्दामुळे मोठ्या प्रमाणात हानी होते. शांततेच्या मार्गाने चालून विकास केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार हिरामण वरखडे यांनी केले.आदिवासी नृत्य सादर करून विजय मानकर यांचे स्वागत करण्यात आले.
आदिवासी संस्कृती मानवतावादाची जननी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 11:41 PM
पर्यावरण संवर्धन मानवतावाद, स्त्री-पुरूष समानता, समाजवाद आदी विषयांवर आज चर्चा होत असली तरी या सर्व बाबींची जननी आदिवासी संस्कृती आहे,
ठळक मुद्देविजय मानकर यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत मूलनिवासी-आदिवासी संमेलन