लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.निदर्शने केल्यानंतर विमाशिसचे पदाधिकारी व शिक्षकांनी शिक्षणाधिकाºयांना भेटून त्यांना निवेदन सादर केले. त्यांच्यामार्फत मागण्यांच निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनात सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची कार्यवाही करावी, २० टक्के अनुदान पात्र, राज्यातील सर्व शाळा, वर्ग व तुकड्यांना टप्पा अनुदान विनाअट मंजूर करावे, अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करावी, शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याबाबतचा २३ आॅक्टोबर २०१७ चा जाचक शासन निर्णय रद्द करावा, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, शिक्षकेत्तर कर्मचाºयांचा सुधारित आकृतीबंध लागू करून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्तपदे भरण्यात यावी, शालार्थ आयडीची प्रलंबित प्रकरणे मंजूर करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.या आंदोलनादरम्यान संघटनेचे जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास भोयर, रवींद्र बांबोळे, चोखाजी भांडेकर, यादव बानबले, यशवंत रायपुरे, माणिक पिल्लारे, संजय दौरेवार, रेवनाथ लांजेवार, विनोद सालेकर, गजानन बारसागडे, अरविंद लांजेवार, सुरेंद्र मामिडवार, अरविंद उरकुडे, संजय घोटेकर आदीसह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 10:30 PM
राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन : शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर विमाशिसंची निदर्शने