आॅनलाईन लोकमतगडचिरोली : राज्यभरातील व्याघ्रगणना २० ते २५ जानेवारी या कालावधीत करण्याचे नियोजन वन विभागाने केले आहे. मात्र मागील एक महिन्यांपासून वनरक्षक व वनपालांनी तांत्रिक कामांवर बहिष्कार घातला असल्याने व्याघ्रगणना अडचणीत येण्याची शक्यता आहे.वनरक्षक व वनपाल हे तांत्रिक कर्मचारी नाहीत, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासही शासन चालढकल करीत आहे. शासन आपल्याला तांत्रिक कर्मचारी मानत नसल्याने आपण तांत्रिक कामे करणार नाही, असा पवित्रा घेत राज्यभरातील वनरक्षक व वनपालांनी १२ नोव्हेंबरपासून तांत्रिक कामांवर बहिष्कार घातला आहे. वन गुन्ह्यांची नोंद करणे, रोपट्यांची नोंद करणे आदी महत्त्वपूर्ण बाबी वन विभाग जीपीएसच्या माध्यमातून करीत आहे. यासाठी वनरक्षक व वनपालांना पीडीए सयंत्र दिले आहे. ११ नोव्हेंबरच्या आंदोलनानंतर वनपाल व वनकर्मचाऱ्यांनी पीडीए सयंत्र परत केले आहे.देशभरातील व्याघ्रगणना दर चार वर्षांनी केली जाते. यावर्षी व्याघ्रगणना २० ते २५ जानेवारी या कालावधीत केली जाणार आहे. व्याघ्रगणना करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वनरक्षक व वनपाल पार पाडतात. व्याघ्रगणनेचे कामही जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून केले जाते. मात्र वनरक्षक व वनपालांनी जीपीएस यंत्र परत केले असल्याने व्याघ्रगणना अडचणीत येणार आहे. त्यामुळे शासन नेमका कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
वनरक्षकांच्या बहिष्काराने राज्यातील यंदाची व्याघ्रगणना अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 10:35 AM
राज्यभरातील व्याघ्रगणना २० ते २५ जानेवारी या कालावधीत करण्याचे नियोजन वन विभागाने केले आहे. मात्र मागील एक महिन्यांपासून वनरक्षक व वनपालांनी तांत्रिक कामांवर बहिष्कार घातला असल्याने व्याघ्रगणना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देपीडीए केला परत : २० पासून जनगणना