लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसून असलेला तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास येथील लहरीबाबा मठासमोर घडली. अपघात एवढा भीषण होता की, त्याच्या मेंदूचे तुकडे तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले होते.प्रशांत भैय्याजी श्रीरंगे (२६) रा.लवारी (उमरी) असे मृताचे नाव आहे. रवींद्र भजने (३०) रा.लोहारा असे जखमीचे नाव आहे. हे दोघे सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुचाकीने (एमएच ३५ एबी ४३९९) जात होते. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने (एमएच १२ एफझेड ४३९०) येथील लहरीबाबा मठासमोर दुचाकीला मागून धडक दिली. त्यात मागे बसून असलेला प्रशांत खाली फेकला गेला आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्याच्या डोक्याचे तुकडे होवून मेंदू अक्षरश: रस्त्यावर विखुरला होता. तर चालक रवींद्र हा किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ट्रकचा क्रमांक मिळाल्याने मौदा येथील टोल नाक्यावर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. प्रशांतचे साकोली येथे सायकल स्टोर्ट असून गतवर्षीच त्याचे लग्न झाले होते. अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. समोरील दृष्य पाहून प्रत्येक जण हळहळताना दिसत होता.कंस्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा नोंदविण्याची मागणीसाकोली येथे राष्ट्रीय महामार्गावर पाच-सहा महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता एकपदरी करण्यात आला. उड्डाणपुलाचे काम करण्यापूर्वी यंत्रणेने सर्व्हीस रोडचे काम केले नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या अपघाताला जबाबदार जेएमसी कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार ओम गायकवाड, किशोर चन्ने, राजू साखरे, नंदकिशोर गेडाम, विजय दुधे, उमेश भुरे, पप्पू शेख, इमरान खान, राजू गुप्ता, शुभम शेळके, विनायक देशमुख यांनी साकोली पोलीस ठाण्यात दिली. तसेच मृताच्या कुटुंबियाला आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. यावर जेएमसी कंपनीने मृताच्या कुटुंबियाला एक लाख रुपयांची मदत दिली.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 10:33 PM
भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसून असलेला तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास येथील लहरीबाबा मठासमोर घडली. अपघात एवढा भीषण होता की, त्याच्या मेंदूचे तुकडे तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले होते.
ठळक मुद्देसाकोलीची घटना : उड्डाणपुलाच्या कामाने घेतला तरुणाचा बळी