सिरोंचा तालुक्यातून छत्तीसगड राज्यात जाण्यास एकमात्र मार्ग म्हणजे निजामबाद-जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग हाेय. परंतु, या मार्गातील बहुतेक छोटे-मोठे पुलाचे निर्माण कार्य सुरू आहे, पण या कामांची गती फारच कमी आहे. वाहनांना जाण्यासाठी पुलाच्या बाजूने कच्चा रस्ता बनविण्यात आला. परंतु, पावसाच्या पाण्यात रस्ता वाहून गेल्याने वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी मंगळवारला झालेल्या जोरदार पावसात छत्तीसगडकडे जात असलेल्या पुलाजवळ ट्रक फसून पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने ट्रकमध्ये संपूर्ण साखर नष्ट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या मार्गावर अनेक घटना होत आहे; परंतु संबंधित विभागाचे अधिकारी मौन धारण केलेले आहे. कंत्राटदार मात्र हळूहळू काम करीत आहे. वारंवार वाहनधारकांना होत असलेल्या त्रासामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
पुलाअभावी ट्रक पाण्यामध्ये काेसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:44 AM