लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : तेंदूपत्त्याची पोती भरून जात असलेल्या ट्रकला आग लागल्याने तेंदूपत्त्यासह ट्रक जळून खाक झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजता आलापल्ली येथे घडली. ट्रकमध्ये जवळपास ३० लाखांचा तेंदूपत्ता होता.फळीवर गोळा केलेला तेंदूपत्ता आता गोदामात साठविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी ट्रकच्या मदतीने तेंदूपत्त्याची वाहतूक केली जात आहे. सीजी ०८ एएच ९१११ क्रमांकाचा ट्रक वेलगूर येथून तेंदूपत्ता घेऊन बल्लारपूरकडे जात होता. आलापल्ली शहरातून ट्रक जात असताना ट्रकवरील पोत्यांचा वीज तारांना स्पर्श झाला. त्यामुळे ट्रक लागली. ट्रकमध्ये केवळ वाहन चालक असल्याने ट्रकला लागलेली आग ट्रक चालकाच्या लक्षात आली नाही. आलापल्ली येथील युवकांना ट्रक जळत असल्याची बाब लक्षात आली. सदर घटना ट्रक चालकाच्या लक्षात आणून दिली. गावात ट्रक उभा ठेवल्यास इतर दुकाने व घरांना आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहन चालकाने ट्रक गावाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आलापल्ली येथील राम मंदिरापासून ते जेमतेम रेड्डी पार्कपर्यंतच वाहन जाऊ शकले. यादरम्यान वाहन जात असताना जळते तेंदूपत्त्याचे पोते रस्त्यावर पडत होते. त्यामुळे राम मंदिर ते रेड्डीपार्कपर्यंत आग पसरल्याचे चित्र निर्माण झाले होते. वाहन चालकाने शहीद अजय मास्टे चौकातून सिरोंचाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहन वळवून उभे केले. या सर्व घटनेत सुदैवाने वाहन चालक सुरक्षित आहे. अहेरीचे पोलीस निरिक्षक सतिश होडगर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाच्या वाहनाचे चालक नसल्याने वाहन उपलब्ध झाले नाही. काही वेळातच ट्रक जळून खाक झाला.ओव्हरलोड तेंदूपत्ता नेणाऱ्या वाहनांवर कारवाई नाहीतेंदूपत्ता हलका राहत असल्याने ट्रकपेक्षा अधिक उंचावर पोते भरले जातात. या पोत्यांचा गावातील वीज तारांना स्पर्श होऊन आगी लागल्याच्या घटना घडतात. अशा वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलीस यांच्या मार्फत कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस उंचच उंच तेंदूपत्त्याच्या थप्प्या ट्रकमध्ये भरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वाहनांवर कारवाई होणे आवश्यक आहे.
तेंदूपत्त्याने भरलेल्या ट्रकला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 9:30 PM
तेंदूपत्त्याची पोती भरून जात असलेल्या ट्रकला आग लागल्याने तेंदूपत्त्यासह ट्रक जळून खाक झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजता आलापल्ली येथे घडली. ट्रकमध्ये जवळपास ३० लाखांचा तेंदूपत्ता होता.
ठळक मुद्देवीज तारांना स्पर्श : आलापल्ली येथील घटना