लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तुम्हाला एकलव्य माहीत आहे? त्याने विद्या ग्रहण करण्यासाठी ज्या पद्धतीने मेहनत घेतली तशी मेहनत घेण्याची तयारी ठेवा आणि एकलव्य बनण्याचा प्रयत्न करा, असे मार्गदर्शन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अहेरी येथे विद्यार्थ्यांना केले.आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ते बोलत होते.अहेरी दौºयात बुधवार दि.18 रोजी राज्यपालांनी सदर शाळेला भेट दिल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. त्याला राज्यपालांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.तुमच्या जीवनातील अविस्मरणीय आठवणी कोणत्या, असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने केला, त्यावर राज्यपालांनी आपल्या शालेय जीवनातील काही आठवणी सांगितल्या. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय होईल असे काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. विपरित परिस्थितीत आपण शिक्षण पूर्ण केल्याचे सांगून त्यांनी यश मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.तुमचे उत्तराखंड आणि गडचिरोली यात काय फरक दिसतो, या एका विद्यार्थिनीच्या प्रश्नावर आपल्याला कुठेही गेलो तरी भारत दिसतो असे राज्यपाल म्हणाले. हिमालय असो की गडचिरोली, जिथे भारत माता की जय ऐकायला मिळते तिथे मला आपल्या घरातील लोक दिसतात असे ते म्हणाले.यावेळी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे राज्यपालांनी अवलोकन केले. विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून त्यांना प्रत्येक प्रयोगाची माहिती दिल्यानंतर त्यांचे राज्यपालांनी कौतुक केले.यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.विजय राठोड, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा एसडीओ राहुल गुप्ता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.गाचे प्रकल्प अधिकारी तथा एसडीओ राहुल गुप्ता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
एकलव्य बनण्याचा प्रयत्न करा; अहेरीच्या विद्यार्थ्यांशी राज्यपालांचा संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 2:55 PM