शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
3
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
4
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
5
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
6
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
7
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
8
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
9
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
10
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
11
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
12
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
13
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
14
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
15
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
16
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
17
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
18
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
19
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
20
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...

तुळशीतील १७० एकर धान तुडतुड्याने केले नष्ट

By admin | Published: November 02, 2014 10:34 PM

देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथे पावसाळी हंगामातील धानपीकावर तुडतुड्याने आक्रमण केले असून एकाच गावातील १७० एकर शेतातील धानपीकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे.

तुळशी : देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथे पावसाळी हंगामातील धानपीकावर तुडतुड्याने आक्रमण केले असून एकाच गावातील १७० एकर शेतातील धानपीकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. तुळशी गावात यावर्षी जवळपास ३७५ हेक्टर शेती धानपीकाखाली आहे. शेतकऱ्यांना रोवणीपासून फवारणीपर्यंत जवळपास ३० हजार रूपये खर्च शेतीवर आला. धान ऐन कापणीला आलेले असताना १५ दिवसांपूर्वी तुडतुडाचे जोरदार आक्रमण धानपीकावर झाले व जवळजवळ १७० एकर शेत जमिनीवरचे धान पूर्णत: नष्ट झाले आहेत. तुळशी येथील शेतकरी अल्पभुधारक असून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. तुळशी येथील विष्णू दुनेदार यांचे ५ एकर, नरेंद्र दुनेदार यांचे ३ एकर, लालाजी नाकाडे यांचे ३ एकर, महादेव राऊत २ एकर, यशवंत राऊत २ एकर, बाबुराव पत्रे ३ एकर, ज्ञानेश्वर सुकारे २ एकर, केवलराम दोनाडकर १ एकर, हर्षवर्धन लोणारे ३ एकर, हुमणे २ एकर, हरिजी पिल्लारे ३ एकर, कान्हाजी दुनेदार ३ एकर, रसिका झुरे १ एकर, मोरेश्वर दुनेदार १ एकर, प्रकाश पत्रे २ एकर, मोतीलाल दोनाडकर या शेतकऱ्याचे १ एकरावरील धान पूर्णत: तुडतुड्यामुळे हातून निघून गेले आहे. तुडतुड्याची लागन होताच कृषी विभागाने तत्काळ मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विविध कंपन्यांची औषधीसुध्दा फवारली. परंतु त्याचाही काहीही उपयोग झाला नाही, असे शेतकरी वसंत मिरगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शासनाने तत्काळ सर्व्हेक्षण करून एकरी २० हजार रूपयाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणविस यांना निवेदन सादर करणार आहेत.(वार्ताहर)