शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

पुराने अनेक मार्ग बंद

By admin | Published: August 15, 2015 12:12 AM

जनजीवन विस्कळीत : गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याचा परिणाम

अहेरीतील घरांमध्ये शिरले पावसाचे पाणीनगर पंचायतीने यावर्षी नाल्यांचा उपसा करण्याकडे दुर्लक्ष केले. अहेरीत गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. मुसळधार पावसामुळे गाळाने भरलेल्या नाल्या चोकअप झाल्या. परिणामी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले. अहेरी शहराला दुपारी १२ वाजेपर्यंत बेठाचे स्वरूप प्राप्त झाले होते. घरामध्ये पाणी शिरल्याने शेकडो नागरिकांचे दैनंदिन उपयोगी साहित्य खराब झाले आहे. याचा दोष नागरिक नगर पंचायत प्रशासनाला देत आहेत. रस्त्यावर पाणी साचले असल्याने आझाद चौक ते दानशूर चौक या मार्गावरील वाहतूक सुध्दा काही कालावधीसाठी बंद झाली होती. अहेरीतील वार्ड क्रमांक तीन मधील आझाद चौक ते दानशूर चौक मार्गावरील प्रदीप पुद्दटवार, राजेंद्र पारेल्लीवार, कवडू नेवले, संजय नरहरशेट्टीवार यांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले.अंकिसा : तीन महिन्यांपूर्वी येर्रावागू नाल्यावरील पूल वाहून गेला. उन्हाळ्यामध्ये प्रशासनाने या पुलाची दुरूस्ती केली नाही. अंकिसा येथे बालमुत्यमपल्ली, गर्रेपल्ली, चेतालपल्ली, गोल्लगुडम व आसरअल्ली येथील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्याचबरोबर नागरिकही विविध कामांसाठी अंकिसा येथे जातात. या नाल्यावरील पूल तुटला असल्याने नागरिक जीव धोक्यात घालून नायलाजास्तव प्रवास करीत आहेत. मागील दोन दिवसांपासून या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. तरीही नागरिक नाल्यातून प्रवास करीत आहेत.४० गावांचा संपर्क तुटलाअहेरी-देवलमरी मार्गावरील गडअहेरीच्या ठेंगण्या पुलावर पाणी असल्याने देवलमरी, इंदाराम, व्यंकटापूर, व्यंकटरावपेठा, चेरपल्ली, गडबामणीसह ४० गावांचा संपर्क तुटला. चौडमपल्ली पुलावरून पाणीआष्टी-आलापल्ली मार्गावर असलेल्या चौडमपल्ली नाल्यावरच्या पुलावर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पाणी चढले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प पडली होती. या कालावधीत या मार्गावर वाहनांची फार मोठी रांग लागली होती. अचानक मार्ग बंद झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला.नगर पंचायतीच्या कारभाराविषयी अहेरीतील नागरिक संतप्तनगर पंचायतीची स्थापना झाल्यापासून अहेरी शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा येथील नागरिक बाळगुण होते. मात्र प्रत्येक्षात नगर पंचायतीची स्थापना होऊनही कोणताच फरक पडला नाही. नगर पंचायतीने पावसाळ्यापूर्वी नाल्या उपसल्या नाहीत. त्यामुळेच पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले. अनेक नागरिकांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. नगर परिषदेच्या या अनागोंदी कारभाराविषयी अहेरी येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आता तरी नाल्या उपसाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.आष्टी येथे घराचे छत कोसळून आर्थिक नुकसानगुरूवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी येथील वार्ड क्रमांक ५ मधील यशवंत खोब्रागडे यांचे राहते घर शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कोसळले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरामध्ये ठेवलेले साहित्य मात्र पाण्याने भिजले आहेत. यामध्ये २० ते २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्यात घर कोसळल्याने खोब्रागडे कुटुंबियांसमोर निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.