९९ युनिटमध्ये हंगाम : जिल्ह्यातील दीड लाख मजूर कुटुंबांना मिळाला रोजगारगडचिरोली : गडचिरोली वनवृत्तांतर्गत वडसा, आलापल्ली, गडचिरोली, सिरोंचा व भामरागड या पाचही वन विभागात पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील मिळून एकूण ९९ तेंदू युनिटमध्ये तेंदू संकलनाचे काम करण्यात आले. या सर्व युनिटमध्ये मे अखेरपर्यंत एकूण १ लाख २५ हजार ५२६ प्रमाणित गोणी तेंदू संकलन झाले आहे. या तेंदू संकलनातून जिल्ह्यातील दीड लाख मजूर कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. याशिवाय पेसा क्षेत्रातील अनेक तेंदू घटकांमध्ये तेंदू संकलनाचे व्यवस्थापन ग्रामसभांनी स्वत: केल्यामुळे ग्रामसभाही मालमाल झाल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यात यंदा २४ एप्रिलपासून तेंदू संकलनाचे काम सुरू झाले. मे अखेरीस सदर तेंदू हंगाम संपलेला आहे. गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत वडसा, गडचिरोली व आलापल्ली या तीन वन विभागात नॉन पेसा क्षेत्रातील एकूण २६ तेंदू घटकामध्ये तेंदू संकलनाचे काम करण्यात आले. या २६ तेंदू घटकामध्ये मे अखेरपर्यंत एकूण ३९ हजार ३९२ प्रमाणित गोणी तेंदू संकलनाचे काम झाले असून याची टक्केवारी ९३.९५ 78आहे. गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत पाचही वन विभागात पेसा क्षेत्रातील एकूण ७३ तेंदू घटकात तेंदू संकलनाचे काम करण्यात आले. या ७३ तेंदू घटकामध्ये मे अखेरपर्यंत एकूण ८६ हजार १३४ प्रमाणित गोणी तेंदू संकलन झाले आहे. याची टक्केवारी ९२.२० आहे. अनेक तेंदू घटकांमध्ये यावर्षी तेंदू संकलनाचे काम उशिरा सुरू झाले. पावसाळा तोंडावर आल्याने तेंदू हंगामाला पूर्णविराम देण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)नॉन पेसा क्षेत्रातील मजुरांना मिळणार बोनसगडचिरोली वनवृत्तांतर्गत नॉन पेसा क्षेत्रातील एकूण २६ तेंदू घटकांमध्ये यावर्षी तेंदू संकलनाचे काम झाले. या तेंदू घटकात संकलन करणाऱ्या मजुरांना वन विभागातर्फे बोनस देण्यात येणार आहे. मात्र पेसा क्षेत्रातील बहुतांश तेंदू युनिट ग्रामसभांनी स्वत: घेतले. या तेंदू घटकात ग्रामसभांनी तेंदू संकलनाचे व्यवस्थापन, विक्री केली. या तेंदू घटकातील तेंदू संकलन करणाऱ्या मजुरांना वन विभागातर्फे बोनस मिळणार नाही. ग्रामसभेच्या निर्णयावर बोनस देण्याची कार्यवाही अवलंबून आहे. त्यामुळे पेसा क्षेत्रातील मजुरांना बोनस मिळण्याची शक्यता कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातूनही तेंदू संकलनाच्या कामासाठी मजुरांचे जत्थे तेंदू फळीच्या गावी दाखल झाले होते.गतवर्षीच्या तुलनेत तेंदू संकलन घटलेगतवर्षी २०१५ मध्ये गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत पाचही वन विभागात पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील तेंदू घटकांमध्ये झालेल्या तेंदू संकलनाची टक्केवारी १०० होती. मात्र यंदा पेसा क्षेत्राच्या तेंदू घटकात ९२ तर नॉन पेसा क्षेत्रातील तेंदू घटकात ९३ टक्के तेंदू संकलनाचे काम झाले आहे. वातावरणाच्या बदलामुळे यंदा तेंदूपत्ता योग्यरित्या वाढला नाही. परिणामी यंदा तेंदू संकलन घटले. तेंदू संकलनामध्ये ७ ते ८ टक्क्यांची घसरण यंदा झाली आहे.
सव्वा लाख प्रमाणित गोणी तेंदू संकलन
By admin | Published: June 02, 2016 2:50 AM