लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे व तंटामुक्त समिती व दारूबंदी पथकाने मिळून गुरूवारी रात्री दारूविक्रेत्याच्या घरी धाड टाकून १ लाख ३८ हजारांची अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार झाले आहेत.पिंटू बाविटकर, विनोद फुलझेले व मनोज झाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर संजय मंडल व प्रदीप मंडल हे दोघेजण आपली मोटारसायकल सोडून पळ काढले. एमएच-३३-०३६० व दुसरी होंडा स्कुटी नवीन दुचाकी आहे. या दोन्ही दुचाकी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या. विनोद फुलझेले याच्याकडून २२ निपा, प्रदीप मंडल, संजय मंडल व पिंटू बाविटकर यांच्याकडून ३३६ निपा व मनोज झाडे याचेकडून १४४ निपा जप्त करण्यात आल्या. सदर दारूची किंमत ५३ हजार ५०० रूपये असून दोन्ही दुचाकींची किंमत मिळून एकूण १ लाख ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापळे, संघरक्षित फुलझेले, तंमुसचे अध्यक्ष व्यंकटी बुर्ले, सरपंच वर्षा देशमुख व सदस्यांनी केली.
दुचाकीसह सव्वा लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:51 AM
आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे व तंटामुक्त समिती व दारूबंदी पथकाने मिळून गुरूवारी रात्री दारूविक्रेत्याच्या घरी धाड टाकून १ लाख ३८ हजारांची अवैध दारू जप्त केली.
ठळक मुद्देआष्टी पोलिसांची कारवाई : दोन दुचाकी सापडल्या