पुल्लीगुड्डमगावानजीक कारवाई : तस्कर फरार होण्यात यशस्वीसिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर वन परिक्षेत्रातील पुल्लीगुड्डम गावानजीक अवैधरित्या बैलबंडीच्या सहाय्याने मौल्यवान सागवान लठ्याची तस्करी केली जात असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वनाधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी पुल्लीगुड्डम गावानजीकच्या परिसरात धाड टाकून बुधवारी २ लाख ८८ हजार रूपयांचे सागवान व ९ बैल आणि ३ बंड्या जप्त केले. झिंगानूरचे वन परिक्षेत्राधिकारी डी. जी. रामटेके, टेकाम, नरोटे, तलांडी, कडमपल्ले, गायकवाड, वनरक्षक सुरपाम व इतर वन कर्मचारी सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. शुक्ला, उपविभागीय वनाधिकारी बेलेकर, पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झिंगानूर व आसरअल्ली वन परिक्षेत्राच्या सीमेवरील पुल्लीगुड्डम गावाजवळ वन मजुरांसह गस्त घालित होते. त्यानंतर माहिती मिळताच पुल्लीगुड्डम गावाजवळ ८६ हजार ५९५ रूपये किमतीचे १० नग सागवानी लठ्ठे जप्त केले. १ लाख २० हजार रूपये किमतीचे ९ बैल ताब्यात घेतले. वन तस्कर आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. त्यांच्याविरोधात वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नऊ बैलांसह अडीच लाखांचे सागवान जप्त
By admin | Published: July 01, 2016 1:21 AM