लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना धान खरेदी केंद्राच्या शुभारंभ कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले नसल्याबद्दल रोष व्यक्त करत आ.कृष्णा गजबे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या केंद्रावर पुन्हा उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्याचा प्रकार घडला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलीस व इतरांनी समजूत घातल्यानंतर वातावरण निवळले.हलक्या धानाच्या मळणीचे काम आटोपले आहे तर मध्यम धानाची कापणी झाली आहे. कुरखेडा येथे धान खरेदी केंद्र सुरू करावे यासाठी कुरखेडा येथील काही शेतकºयांनी मागील तीन दिवसांपासून काँग्रेस पदाधिकाºयांच्या नेतृत्वात उपोषण आंदोलन सुरू केले होते. गुरूवारी आंदोलनकर्ते व आविमचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बन्सोडे यांच्यात चर्चा झाली. मात्र चर्चेदरम्यान तोडगा निघत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी बन्सोडे यांना चार तास घेराव घातला होता. शुक्रवारी धान खरेदी केंद्र सुरू केले जाईल असे आश्वासन बन्सोडे यांनी दिले. शुक्रवारी सकाळी १० वाजता आमदार कृष्णा गजबे यांनी या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले. त्यानंतर आविमचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, बन्सोडे व इतर कर्मचारी उपोषण मंडपात पोहोचले. धान खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले असल्याने उपोषण सोडण्याची विनंती केली. ही बाब कळताच आंदोलनकर्ते चांगलेच संतापले. केंद्र सुरू करण्यासाठी आपण प्राणाची बाजी लावली मात्र उद्घाटन आमदारांच्या हस्ते कसे केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावरून कर्मचारी व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. ठाणेदार सुरेश चिल्लावार, प्रभारी तहसीलदार सुधाकर मडावी यांंनी मध्यस्थी करीत वाद शमविला. दुपारी १ वाजता आंदोलनकर्ते वयोवृद्ध शेतकरी पांडुरंग लंजे, आनंदराव जांभूळकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य प्रल्हाद कºहाडे, प्रभाकर तुलावी, पं.स.सभापती गिरीधर तितराम, उपसभापती मनोज दुनेदार, माजी जि.प.अध्यक्ष जीवन नाट, काँगे्रस तालुकाध्यक्ष जयंत हरडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी हजर होते.
धान केंद्राचे दोनदा उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 11:54 PM
धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना धान खरेदी केंद्राच्या शुभारंभ कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले नसल्याबद्दल रोष व्यक्त करत आ.कृष्णा गजबे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या केंद्रावर पुन्हा उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्याचा प्रकार घडला.
ठळक मुद्देआंदोलनकर्ते आक्रमक : कुरखेडात तणावपूर्ण वातावरण