एटापल्ली : तालुक्यातील कसनसूर उपपाेलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका शेतशिवारात तब्बल अडीच लाख रुपयांची दारू लपवून ठेवली असल्याचे उघडकीस आले. गुप्त माहितीवरून पाेलिसांनी छापा मारून दारूसाठा जप्त करत एका आराेपीला अटक केली. तर दुसरा पळून जाण्यास यशस्वी झाला.
जायजाेन सॅम्युअल टाेपाे (५५) रा.वेनासर, ता.एटापल्ली असे अटक केलेल्या तर मनाेज जगदीश मुजुमदार रा.एटापल्ली असे पळून गेलेल्या आराेपीचे नाव आहे. वेनासर येथील शेतशिवारात असलेल्या आराेपीच्या झाेपडीत दारूसाठा लपवून ठेवल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार पाेलिसांनी दाेन साक्षीदारांसह झाेपडीची तपासणी केली. त्यात गाेवा विस्की कंपनीच्या १८० मिलीच्या देशी, विदेशी दारूच्या १६८० नग निप आढळल्या. त्यांची किंमत २ लाख ५२ हजार रुपये आहे. या ठिकाणावरून दारूचा पुरवठा किरकाेळ विक्रेत्यांना केला जात असल्याचे तपासात समाेर आले.
ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक संकेत नानाेटी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दुर्याेधन राठाेड, ज्ञानेश्वर धनगर, महेश गरड तसेच पाेलीस हवालदार राजू उराडे, नायक सुनील मडावी, शिपाई धरमदास भुसारी, संजय देशमुख, लक्ष्मण तरंगे यांनी केली.