राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. त्या अनुषंगाने १९ जून राेजी जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जाताे. आराेग्य विभागाच्या वतीने व्यापक प्रमाणात जनजागृती केली जाते. सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात. साेल्युबिलिटी चाचणी करणे, औषधाेपचार करणे समुपदेशन व मार्गदर्शन यावरही भर दिला जाताे. सिकलसेल आजाराची तपासणी, उपचार, प्रसार व प्रतिबंध तसेच औषधाेपचार व आवश्यकतेनुसार रक्त संक्रमण याची माहिती दिली जाते. विशेष म्हणजे, सिकलसेलग्रस्त रुग्णांना संजय गांधी निराधार याेजनेंतर्गत १ हजार रुपये मासिक अनुदान तसेच जीवनदायी याेजनेचा लाभ, माेफत रक्त पुरवठा व उपचार केला जाताे, असे जिल्हा आराेग्य अधिकारी यांनी सांगितले.
बाॅक्स ........
अशी वाढली रुग्णसंख्या
गडचिराेली जिल्ह्यात २००९ - १० या वर्षात ६६ सिकलसेलग्रस्त हाेते, तर ३५४ वाहक हाेते. २०१० - ११मध्ये ६६२ सिकलसेलग्रस्त, तर ३ हजार ९१६ वाहक, २०११ - १२मध्ये २८३ ग्रस्त, तर २ हजार ३८० वाहक, एप्रिल २०१२ ते मार्च २०१३मध्ये २४४ सिकलसेलग्रस्त, तर ३ हजार ३६२ वाहक, २०१३ - १४मध्ये १८८ ग्रस्त, तर ४ हजार ५१२ वाहक, २०१४ - १५मध्ये १८७ ग्रस्त, तर ३ हजार ६८३ वाहक आढळून आले. २०१५ - १६मध्ये २६९ ग्रस्त, तर ४ हजार ३०४ वाहक, २०१६ - १७मध्ये २०९ ग्रस्त, तर २ हजार ७८५ वाहक, २०१७ - १८मध्ये १०१ ग्रस्त, तर १ हजार ७१६ वाहक, २०१८ - १९मध्ये ७० ग्रस्त, तर १ हजार ७६० वाहक, २०१९ - २०मध्ये १४१ ग्रस्त, तर २ हजार ५२५ वाहक, २०२० - २१मध्ये ३१ ग्रस्त, ८४६ वाहक, एप्रिल २०२१ ते मे २०२१ या कालावधीत ५ सिकलसेग्रस्त, तर १६१ सिकलसेल वाहक आढळून आले.