लोकमत न्यूज नेटवर्कघोट/आष्टी : घोट व आष्टी येथे झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार झाले. दोन्ही घटना शुक्रवारी घडल्या.चामोर्शी तालुक्यातील घोटमधील आंबेडकर चौकाजवळ एका भरधाव मेटॅडोरने दुचाकीला धडक दिली. यात नेताजीनगर येथील रहिवासी असलेल्या दुचाकीवरील डॉ.सुरज बाला (५५) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली.प्राप्त माहितीनुसार, मेटॅडोर (एमएच ३३, जी ५३७) हा घोट-चामोर्शी मार्गाने जळाऊ लाकडे घेऊन चामोर्शीकडे जात होता. याचवेळी नेताजीनगर येथील डॉ.सुरज बाला हे दुचाकीने (एमएच ३३, पी ७५९७) घोटकडे येत होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. जखमी डॉ.बाला यांना गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलविले जात होते. मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मेटॅडोर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास प्रभारी पोलीस अधिकारी एम.जगदाळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.दुसरा अपघात आष्टी येथे झाला. यात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आष्टी येथील चौकात घडली. अखिम रॉय (३८) रा.आष्टी असे मृतकाचे नाव आहे.एमएच ३४ एव्ही २४१९ क्रमांकाचे चारचाकी वाहन आलापल्लीवरून बल्लारशहाकडे जात होते. दरम्यान आष्टी येथील मुख्य चौकात अहेरी मार्गावरील बसस्थानकावर चारचाकी वाहनधारकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हे वाहन रस्त्याच्या बाजुला उभे असलेल्या दुचाकी वाहनाला धडकले. टपरीवरील चहा पिल्यानंतर अखिम हा दुचाकीवर बसून होता. वाहनाची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढे चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन चहाच्या टपरीत शिरले. मात्र प्रसंगावधानात बाळगत नागरिकांनी चहाटपरीतून पळ काढला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र तीन नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आष्टी येथील मुख्य चौकात चारचाही मार्गाने वाहने येत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
घोट व आष्टीतील अपघातात दोन दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:41 AM
घोट व आष्टी येथे झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार झाले. दोन्ही घटना शुक्रवारी घडल्या. चामोर्शी तालुक्यातील घोटमधील आंबेडकर चौकाजवळ एका भरधाव मेटॅडोरने दुचाकीला धडक दिली.
ठळक मुद्देमेटॅडोरची धडक : चारचाकी वाहन शिरले चहा टपरीत