लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : अहेरी येथील कृषी विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची प्रशासकीय कामांसाठी सुद्धा विलंब होत आहे.अहेरी तालुक्यातील ९५ टक्के जनता शेतीवर आधारित उद्योगांवर अवलंबून आहे. रोजगाराचे इतर कोणतेही साधन नसल्याने शेती जरी साथ देत नसली तरी शेती कसल्याशिवाय पर्याय नाही. शेतीला जोडधंदा करून प्रपंच चालविण्याची धडपड येथील शेतकरी करीत आहेत. कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र कृषी विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र कृषी विभागात असलेल्या रिक्तपदांमुळे सदर विभाग पांगळा झाला आहे. विशेष म्हणजे तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, तालुका सहायक, अनुरेखक यासारखी पदे रिक्त आहेत. तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही पदे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. मात्र हीच पदे रिक्त आहेत.रिक्तपदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांचे काम वेळेवर होत नाही. त्यामुळे त्याला परत जावे लागते. एकदा परत गेलेला शेतकरी पुन्हा योजनेसाठी अर्ज करण्याची हिंमत करीत नाही. रिक्त पदे भरण्याची मागणी आहे.कामास विलंबसुमारे १६ कर्मचाऱ्यांचा भार केवळ दोन कर्मचाºयांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामे होण्यास विलंब होतो. याचा त्रास शेतकºयांना सहन करावा लागतो.
दोनच कर्मचाऱ्यांवर अहेरी कृषी विभागाचा डोलारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 1:41 AM
अहेरी येथील कृषी विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची प्रशासकीय कामांसाठी सुद्धा विलंब होत आहे.
ठळक मुद्दे१६ पैकी १४ पदे रिक्त : लिपिकांनाच सांभाळावा लागतो कारभार