शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
2
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
3
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
4
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
5
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
6
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
7
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
8
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम
9
“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील
10
केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या
11
"मोठी डील झालीय"; तिकीट कापल्यानंतर चंद्रिकापुरेंचे थेट पत्र; म्हणाले, "अजित पवारांनी खंजीर खुपसला"
12
IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
14
अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 
15
“मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
16
एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश
17
"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
18
₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला
19
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी
20
नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

गडचिरोलीत २० लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी जोडप्याचे आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 3:10 PM

२० लाख रुपये बक्षीस असलेल्या एका जहाल नक्षल दाम्पत्याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.  

ठळक मुद्देगडचिरोली पोलीस दलास मोठे यश

गडचिरोली : नक्षली हिंसाचाराला कंटाळून आणि शासनाच्या आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी असलेल्या पुनर्वसन योजनेला प्रतिसाद देत एका नक्षली दाम्पत्याने बुधवारी (दि.१६) गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. या दोघांवर मिळून २० लाख रुपयांचे बक्षीस होते.

दिपक ऊर्फ मुन्शी रामसु ईष्टाम (वय ३४, रा. गडेरी, पोमके कोटमी ता. एटापल्ली जि. गडचिरोली) व शामबत्ती नेवरु आलाम (वय २५, रा. हिदवाडा पो. ओरछा जि. नारायणपुर (छ.ग.)) यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. दिपक ईष्टाम व शामबत्ती आलाम हे दोघे पती-पत्नी असून ते दोघेही प्लाटुन क्र. २१ मध्ये कार्यरत होते. दिपक हा डीव्हिसी पदावर तर शामबत्ती ही प्लाटुन सदस्य म्हणून कार्यरत होती. 

दोघांवर विविध गुन्हे दाखल

दिपक ईष्टाम याच्यावर खूनाचे ३, चकमकीचे ८, जाळपोळ २ असे गुन्हे दाखल असून, पत्नी शामबत्तीवर चकमकीचे २ गुन्हे दाखल आहेत. शासनाने दिपक ईष्टामवर १६ लाख तर शामबत्ती आलामवर ४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

सन २०१९ ते २०२२ पर्यंत ४५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

सन २०१९ ते २०२२ सालामध्ये ४५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ५ डिव्हीसी, २ दलम कमांडर, ३ उपकमांडर, ३४ सदस्य व १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर २ जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षली हालचालींवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे.

आतापर्यंत ६४९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून एकुण १४४ आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना भूखंड वाटप, ११७ आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना घरकुल वाटप, ६४३ आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना आधारकार्ड वाटप, ३६ महिला आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना शिलाई मशिनचे वाटप, २३ आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना शेळी पालन व इतर अनेक शासकीय  योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. त्यामुळे आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांचे प्रमाण वाढत असून ते लोकशाहीच्या मुख्यप्रवाहात सामिल होऊन सन्मानाने जीवन जगत आहेत.

विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी  केले आहे. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली