शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

दोन अपघातात दोघे ठार, तीन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:06 AM

आरमोरी-देसाईगंज मार्गावरील कोंढाळा गावाजवळ गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास रूग्णवाहिका व कार यांची जबर धडक झाली. या धडकेत आरमोरी येथील दोन शिक्षक गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देदोन शिक्षक गंभीर : कोंढाळा गावाजवळ रुग्णवाहिका व कारची टक्कर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/आरमोरी : आरमोरी-देसाईगंज मार्गावरील कोंढाळा गावाजवळ गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास रूग्णवाहिका व कार यांची जबर धडक झाली. या धडकेत आरमोरी येथील दोन शिक्षक गंभीर जखमी झाले. दुसऱ्या अपघातात देऊळगावजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण ठार झाले.कोंढाळाजवळील अपघातात प्रा.अशोक जुवारे (४५) व प्राथमिक शिक्षक महेंद्र गुळदे (४३) रा.आरमोरी हे गंभीर जखमी झाले आहेत. एमएच ३३, ए ५२१० क्रमांकाची कार देसाईगंजवरून आरमोरीकडे येत होती तर एमएच ३३ जी १३५५ क्रमांकाची रूग्णवाहिका गडचिरोलीवरून देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथे जात होती. दरम्यान दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जबर होती की दोन्ही वाहनांचा समोरचा भाग चेंदामेंदा झाला. यामध्ये जुवारे व गुळदे गंभीर जखमी झाले. जुवारे यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. गुळदे यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.तत्पूर्वी बुधवारी रात्री ८ वाजता झालेल्या अपघातात आरमोरीवरून गडचिरोलीकडे जाणाºया कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात देऊळगाव येथे घडला.कृष्णा वासुदेव बुद्धेवार (३८), नीलकंठ मारोती गेडाम (४५) दोघेही रा.देऊळगाव अशी मृतकांची नावे आहेत, तर लतीफ अभिमन्यू निंदेकार (२४) रा.देऊळगाव असे जखमी युवकाचे नाव आहे. लतीफ निंदेकार, कृष्णा बुद्धेवार, नीलकंठ गेडाम हे एमएच-३४-एस-५४ या क्रमांकाच्या दुचाकीने डोंगरसावंगी या गावावरून देऊळगाव येथे येत होते. दरम्यान एमएच-३१-सीएन-७००७ या कारने देऊळगावजळील तलावाजवळ दुचाकीला जबर धडक दिली.अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. गावकºयांनी जखमी तिघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती केले. यातील मृतक कृष्णा वासुदेव बुद्धेवार यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे नेले जात होते. दरम्यान मार्गातच त्यांचा ब्रह्मपुरी गावाजवळ मृत्यू झाला. नीलकंठ गेडाम यांचा गुरूवारी सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. लतीफ निंदेकार यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात