गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पाचही वनविभागातून सुमारे २ लाख ३ हजार ४८२.६८६ प्रमाणित गोणी तेंदू संकलन करण्यात आले आहे. तेंदू संकलनातून वनविभागाला कोट्यवधी रूपयाचा महसूल प्राप्त झाला आहे. तेंदू संकलन हा जिल्ह्यातील सर्वात मोठा रोजगार पुरविणारा उद्योग आहे. तेंदू संकलनाच्या माध्यमातून एक महिन्याचा रोजगार प्राप्त होतो. गडचिरोली जिल्ह्यात उत्कृष्ट दर्जाचा तेंदू मिळत असल्याने राष्ट्रीयस्तरावर या तेंदूपत्त्याला चांगला भाव मिळत असल्याने कंत्राटदारही मजुरांच्या हाताकरवी तेंदू संकलन करतात. यातून वनविभागालासुद्धा कोट्यवधी रूपयाचा निधी प्राप्त होतो. गडचिरोली वनविभागाअंतर्गत असलेल्या ४१ तेंदू घटकापैकी सावरगाव, महावाडा, गडचिरोली, गुरवडा या घटकांचा लिलाव झाला नाही. उर्वरित ३६ तेंदू घटकांमधून ५७ हजार ७३०.४३० प्रमाणित गोणी तेंदू संकलन करण्यात आले. गडचिरोली वनविभागाची तेंदूपत्ता संकलनाची टक्केवारी ९९.२४ टक्के एवढी आहे. गडचिरोली वनविभागातून अमिर्झा घटकातून १०० टक्के तेंदूपत्ता संकलन करण्यात आले. उर्वरित तेंदूपत्ता घटकांमधून ९९ टक्क्यापेक्षा जास्त तेंदूपत्ता संकलन करण्यात आले आहे.वडसा वनविभागातील ३८ युनिटपैकी पोर्ला-मरेगाव, सिर्सी-वासाळा, वैरागड, सावलखेडा, भगवानपूर-मानापूर, आमगाव-रावणवाडी-शंकरपूर या सहा युनिटचा लिलाव झाला नाही. उर्वरित ३२ युनिटमधून ३४ हजार ५५ स्टॅन्डर्ड बॅग तेंदूपत्ता संकलन झाले आहे. तेंदूपत्ता संकलनाची टक्केवारी ९९.२० टक्के एवढी आहे. वडसा वनविभागातून गेवर्धा, गोडरी-कोटगुल या युनिटमधून १०० टक्के तर मरकेकसा या युनिटमधून १०४.७७ टक्के तेंदूपत्ता संकलन झाले आहे. आलापल्ली वनविभागातील ५२ युनिटपैकी केवळ १४ युनिटमधून तेंदूपत्ता संकलन करण्यात आले. यातून २९ हजार ११५.७०१ एक स्टॅन्डर्ड गोणी तेंदूपत्ता संकलन झाले आहे. आलापल्ली वनविभागाची तेंदूपत्ता संकलनाची टक्केवारी ९४.३८ टक्के एवढी आहे.भामरागड वनविभागातील २६ युनिटमधून तेंदूपत्ता संकलन करण्यात आले. एटापल्ली व गेदा या घटकाचे लिलाव झाले नाही. भामरागड वनविभागातून १०२.८३ टक्के तेंदूपत्ता संकलन करण्यात आले. या वनविभागातून ५७ हजार २२७.३७० प्रमाणित गोणी तेंदूपत्ता संकलन झाले. सिरोंचा वनविभागातील १२ घटकांमधून २५ हजार ३५३. ६३६ प्रमाणित गोणी तेंद्रपत्ता संकलन झाले आहे. येथील तेंदूपत्ता संकलनाची टक्केवारी ९८.८ टक्के एवढी आहे. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत पाऊस पडल्याने यावर्षी तेंदूपत्ता चांगला आला होता. (नगर प्रतिनिधी)
दोन लाख गोणी तेंदू संकलन
By admin | Published: June 11, 2014 12:02 AM