शहरं
Join us  
Trending Stories
1
Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?
2
गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी
3
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
4
महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत
5
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
6
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
7
वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
8
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
9
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
10
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
11
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
12
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
13
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
14
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
15
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
16
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
17
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
18
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
19
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
20
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

दोन लाखांवर कुटुंबांना गणेशोत्सवात मिळणार रवा, डाळ, तेल अन् साखर !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 4:48 PM

आनंदात भर : चार शिधा जिन्नसचे होणार वाटप, नियतन मंजुरीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वस्त धान्याचा लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना सणासुदीच्या काळात मदत व्हावी, यासाठी मागील वर्षीपासून 'आनंदाचा शिधा' वितरीत केला जात आहे. शासनाकडून यावर्षीसुद्धा गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे.

जिल्ह्यातील २ लाख १५ हजारांवर पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे. सणानिमित्त आनंदाचा शिधा शासनाकडून वाटप करण्यात येत आहे. यंदा गौरी-गणपतीच्या सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

गणपतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा

  • सणानिमित्त सरकार आनंदाचा शिधा वाटप करत आहे. रेशनकार्डधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात येतो.
  • अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांनादेखील आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल.

तालुका                      अंत्योदय              प्राधान्य               एकूण  गडचिरोली                   ८,८५३                 १७,४७०               २६,३२३धानोरा                        १०,६३०                 ४,३२७                 १४,९५७चामोर्शी                       १२,६४०                २७,२९८               ३९,९३८मुलचेरा                        ५,२४६                 ४,७८७                १०,०३३देसाईगंज                     ४,२९३                  ११,९४०                १६,२३३आरमोरी                      ५,६६२                 १६,३७६                २२,०३८कुरखेडा                      ११,२१७                 ६,५८७                 १७,८०४कोरची                         ४,७९४                 ४,०३५                   ८,८२९अहेरी                           १२,१८०                ८,१७०                  २०,३५०एटापल्ली                     ९,७३०                  ३,६०६                 १३,३३६भामरागड                     ५,६२०                 १,९२५                   ७,५४५सिरोंचा                         ७,७५७                ६,८९८                  १४,६५५

काय काय मिळणार?

  • गौरी-गणपतीच्या सणाला १०० रुपयांमध्ये १ किलोच्या परिमाणात रवा, चणा डाळ, साखर व एक लिटर खाद्यतेल असा आनंदाचा शिधा मिळणार आहे.
  • मागील वर्षी अन्य दोन जिन्नसचा समावेश करण्यात आला होता, परंतु आता पुन्हा सुरुवातीला ज्या जिन्नसचा पुरवठा करण्यात आला. त्याच वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार आहे.

१५ ऑगस्टपासून होणार वितरण१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीत ई-पॉस मशिनवरून लाभार्थी पडताळून आनंदाच्या शिधाचे वितरण केले जाणार आहे. यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना फायदा होईल. गौरी-गणपतीचा उत्सव उत्साहात साजरा होईल.

"पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे. मागील वर्षीसारखेच योग्य पद्धतीने शिधाचे वितरण केले जाणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे. नियतन मंजूर झाल्यानंतर आदेशानुसार वितरण केले जाईल."- दीपक नागरगोजे, पुरवठा निरीक्षक 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाEknath Shindeएकनाथ शिंदेGanpati Festivalगणेशोत्सवDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस