लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीला वाचविण्यासाठी पीडित मुलीची वय जास्त दाखविण्याकरिता खोटे जन्मप्रमाणपत्र देणाºया सेवानिवृत्त अधिकाºयासह या प्रकरणातील आरोपीला प्रत्येकी तीन वर्षांचा कारवास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा आरमोरीच्या तालुका व सत्र न्यायालयाने सोमवारी सुनावली.सेवानिवृत्त अधिकारी येरगुळे व मधुकर रामटेके असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. एका बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीची वय जास्त असल्याचे दाखविण्यासाठी पीडित मुलीच्या जन्म तारखेचा उल्लेख असलेल्या नोंद रजिस्टरमध्ये खाडाखोड करून जन्माचा खोटा दाखला दिला. या खोट्या जन्मदाखल्याचा वापर बलात्कार प्रकरणातील आरोपीची सुटका होण्यासाठी करण्यात आला. याप्रकरणी आरमोरीचे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संजय अटकारे यांनी सोमवारी यावर निकाल देऊन आरोपी येरगुळे व मधुकर रामटेके या दोघांना भादंविचे कलम ४६८ अन्वये प्रत्येकी दोन वर्ष कारावास व एक हजार रूपये दंड तसेच भादंविचे कलम ४६६ अन्वये प्रत्येकी तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.सदर प्रकरणी मधुकर रामटेके, सेवानिवृत्त अधिकारी येरगुळे, निकम या तिघांविरूद्ध आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण आरमोरीच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले. मात्र निकम यांची निर्दोष सुटका करण्यात आली. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक अभियोक्ता सुरेश रासेकर यांनी काम पाहिले.
माजी अधिकाºयासह दोघांना कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:05 AM
बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीला वाचविण्यासाठी पीडित मुलीची वय जास्त दाखविण्याकरिता खोटे जन्मप्रमाणपत्र देणाºया सेवानिवृत्त अधिकाºयासह या प्रकरणातील आरोपीला प्रत्येकी तीन वर्षांचा कारवास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा आरमोरीच्या तालुका व सत्र न्यायालयाने सोमवारी सुनावली.
ठळक मुद्देनिकाल : खोटे जन्मप्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण