शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

शॉर्पशुटरची दोन पथके दाखल

By admin | Published: May 29, 2017 2:16 AM

आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील रवी, कोंढाळा परिसरात दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने आतापर्यंत दोन बळी घेतले.

रवी, कोंढाळा परिसरात सर्चिंग आॅपरेशन सुरू : ‘तो’ नरभक्षक वाघ लवकरच जेरबंद होणारमहेंद्र रामटेके । लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील रवी, कोंढाळा परिसरात दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने आतापर्यंत दोन बळी घेतले. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे आदेश वनमंत्री व प्रधानसचिव (वने) यांनी शुक्रवारी दिल्यानंतर वाघाला पकडण्याची शोधमोहीम युध्दपातळीवर सुरू झाली आहे. ताडोबा येथून शॉर्पशुटरची दोन पथके आरमोरीत दाखल झाली आहेत.शॉर्पशुटर व वनकर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने रवी, कोंढाळा, मुल्लूर चक व उसेगाव परिसराच्या विविध ठिकाणी नरभक्षक वाघाला शोधण्यासाठी सर्चिंग आॅपरेशन सुरू केले आहे. लवकरच ‘तो’ नरभक्षक वाघ जेरबंद होईल, असा आशावाद वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आरमोरी व वडसा वन परिक्षेत्रातील रवी, कोंढाळा, मुलूर चक व उसेगाव परिसरात गेल्या एक ते दीड महिन्यापासून पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. या भागातील जंगल परिसरात रानडुकराचे प्रमाण, पाणी, नदी, नाले, हिरवळ व वाघाला आवश्यक असणारे आश्रयस्थान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाघाचा वावर या भागात वाढला आहे. सदर नरभक्षक वाघाने आजपर्यंत दोन इसमावर हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत.दीड महिन्यापूर्वी मोहफूल वेचण्यासाठी जंगलालगतच्या शेतशिवारात गेलेल्या कोंढाळा येथील लव्हाजी मेश्राम याचा वाघाने बळी घेतला. १३ मे रोजी याच परिसरात शेतकरी वामन मरापे यालाही वाघाने ठार केले. या दोन्ही घटनांमुळे नागरिक प्रचंड भयभित झाले आहेत. सदर वाघ हा मुक्तपणे या परिसरात फिरत असल्याने नेहमीच लोकांना त्याचे दर्शन घडत आहे. वाघाच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडू नयेत म्हणून वाघाला पकडण्यासाठी वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशींग यांच्या मार्गदर्शनात आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयाने रवी परिसरात दोन पिंजरे लावले. तर वडसा वन परिक्षेत्र कार्यालयाने कोंढाळा परिसरात पिंजरे लावले. वाघाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने १३ ट्रॅपींग कॅमेरेही लावले. दिवसा व रात्री या परिसरात वन कर्मचाऱ्यांच्या गस्तीचे प्रमाण वाढविण्यात आले असून लोकांनी जंगलात प्रवेश करू नये, असे आवाहनही करण्यात आले होते. वाघाला पकडण्यासाठी पिंजरे लावून १५ दिवसांचा कालावधी उलटला मात्र ‘तो’ नरभक्षक वाघ पिंजऱ्यात अडकलाच नाही. नागरिकांना विविध ठिकाणी वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये वाघाविषयीची भिती दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व प्रधान वन सचिव विकास खारगे तसेच वरिष्ठ वनाधिकारी गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले असता, वाघाला जेरबंद करण्याची मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी रेटून धरली. त्यानंतर वनमंत्र्यानी २६ मे रोजी सदर नरभक्षक वाघाला तत्काळ जेरबंद करण्याचे आदेश वनाधिकाऱ्यांना दिले. लागलीच शॉर्पशुटरच्या दोन टीम आरमोरीत दाखल झाल्या. वन विभागाने १०-१० वन कर्मचाऱ्यांच्या पाच टीम तयार केल्या आहेत. उपवनसंरक्षक विवेक होशींग यांच्या मार्गदर्शनात आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांच्या नेतृत्वात शॉर्पशुटर व वनकर्मचाऱ्यांचे विविध ठिकाणी सर्चिंग आॅपरेशन सुरू झाले आहे. वाघाला जेरबंद करण्याची मोहीम युध्दपातळीवर सुरू झाली आहे. ताडोबा येथून शॉर्पशुटरच्या १० जणांची टीम आरमोरीतनरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी तोडाबा येथून शॉर्पशुटरची १० जणांची टीम आरमोरीत दाखल झाली आहे. या टीममध्ये वन परिक्षेत्राधिकारी चिडे यांच्यासह शॉर्पशुटर अजय मराठे, डॉ. खोब्रागडे यांचा समावेश आहे. याशिवाय वनाधिकारी व वनकर्मचारी यांचे ३० ते ४० जणांचे पथक नरभक्षक वाघाची शोध मोहीम राबवित आहेत. या शोधमोहिमेत वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशींग यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक कांबळे, चौडींकर, आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर, वडसाचे वन परिक्षेत्राधिकारी चांदेवार हे सुध्दा सहभागी झाले आहेत. दिवसा व रात्री त्या नरभक्षक वाघाचा शोध सुरू असल्याने लवकरच त्या वाघाला जेरबंद करण्यात येणार आहे.