लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आरमोरी पंचायत समितीअंतर्गत जोगीसाखरा केंद्रातील शंकरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार इमारती निर्लेखित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्गखोल्यात दाटीवाटीने बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या शाळेतील इयत्ता आठवीचे विद्यार्थी शाळा परिसरात असलेल्या झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. वर्गखोल्यांअभावी येथील विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.शंकरनगर जि.प. शाळेची इमारत २० वर्षांपूर्वी बांधण्यात आली. मात्र याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने स्लॅबचे तुकडे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर इयत्ता पहिली ते सहावीच्या वर्गखोल्यांच्या चार इमारती निर्लेखित करण्यात आल्या. आता या शाळेमध्ये केवळ दोनच इमारती चांगल्या स्थितीत असून यात वर्ग भरविले जात आहेत. पहिली ते आठवीच्या एकूण १७० विद्यार्थ्यांना या दोन वर्गखोल्यात कोंबून अध्यापनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी व पालक शासनाच्या विरोधात रोष व्यक्त करीत आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी सुविधा म्हणून येथील राजीव भवनात इयत्ता पाचवी व सहावी हे दोन वर्ग भरविण्याची व्यवस्था करून दिली. तर आठवा वर्ग झाडाखाली भरविला जात आहे. हिवाळ्याच्या दिवसात कडाक्याच्या थंडीत बाहेर बसून आठवीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.दाटीवाटीने बसलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या ओरडण्याने कोणत्याच वर्गाचे विषयानुसार चांगले अध्यापन व अध्ययन होत नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे सन २०१७-१८ हे शैक्षणिक सत्र व्यर्थ गेले आहे. यासंदर्भात अधिकाºयांना निवेदन, तक्रारी देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. येथे तत्काळ वर्गखोल्यांचे बांधकाम करून विद्यार्थ्यांची थट्टा थांबवावी, अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार, असा इशारा शाळा समितीचे अध्यक्ष देवा बिश्वास व पालकांनी दिला आहे.शिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्षजि.प. उच्च प्राथमिक शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी हे भामरागड तालुक्यातील शाळांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेत आहेत. यासंदर्भातील बातम्या वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्या. मात्र त्यांचे शंकरनगर शाळेकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
दोन वर्गखोल्यांत भरतात आठ वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 10:36 PM
आरमोरी पंचायत समितीअंतर्गत जोगीसाखरा केंद्रातील शंकरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार इमारती निर्लेखित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्गखोल्यात दाटीवाटीने बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.
ठळक मुद्देशंकरनगर शाळेतील स्थिती : आठवीचे विद्यार्थी झाडाखाली बसून गिरवितात शिक्षणाचे धडे