लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा येथून पाच किमी अंतरावरील राष्ट्रीय महामार्ग ६३ वर रामंजापूरजवळील पेट्रोलपंपासमोर रविवारी ४.३० वाजता ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एक जागीच ठार झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले.रमेश लचीरेड्डी येमनुरी (३५) रा. निलवाही (तेलंगणा राज्य) असे मृतकाचे नाव असून तो चेन्नूर येथे लाईनमन पदावर कार्यरत होता. शारदा येमनुरी (२८) व सुजीत रमेश रत्ना (६) रा. सुरारम असे जखमींची नावे आहेत. रमेश येमनुरी हा १ एप्रिल रोजी सिरोंचा तालुक्यातील रामंजापूर येथे नातेवाईकाकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पत्नी शारदा येमनुरी (२८) व सुजीत रमेश रत्ना (६) रा. सुरारम यांच्यासोबत आला होता. कार्यक्रम आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गाच्या वळणावर टीएस १२ यूव्ही ६१४० क्रमांकाच्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. यामध्ये रमेशचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी शारदा येमनुरी व सुजीत रत्ना हे गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रूग्णालय सिरोंचा येथे दाखल करण्यात आले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तेलंगणा रज्यातील वरंगल येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
ट्रकची दुचाकीला धडक- एक जागीच ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:20 AM
लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा येथून पाच किमी अंतरावरील राष्ट्रीय महामार्ग ६३ वर रामंजापूरजवळील पेट्रोलपंपासमोर रविवारी ४.३० वाजता ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एक जागीच ठार झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले.रमेश लचीरेड्डी येमनुरी (३५) रा. निलवाही (तेलंगणा राज्य) असे मृतकाचे नाव असून तो चेन्नूर येथे लाईनमन पदावर कार्यरत ...
ठळक मुद्देरामंजापूरजवळील घटना : तिघेही तेलंगणा राज्यातील नागरिक