शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

दोन दिवसांत ५०० वर दुचाकी गाड्यांची विक्री

By admin | Published: April 01, 2017 1:54 AM

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बीएस ४ नियमावलीचे अनुपालन न करणारी नवी वाहने १ एप्रिल २०१७

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम : शहरातील सर्वच शोरूममध्ये खरेदीदारांची तोबा गर्दी गडचिरोली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बीएस ४ नियमावलीचे अनुपालन न करणारी नवी वाहने १ एप्रिल २०१७ पासून विकण्यास बंदी घालण्याचा निर्णय दिला व अशी वाहने विकण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत दिली. त्यामुळे गडचिरोली शहरासह तालुका मुख्यालय ठिकाणच्या वितरकांनी बीएस ३ ची दुचाकी वाहने खरेदीत ग्राहकांना भरघोस सूट दिली. कमी किमतीत दुचाकी गाड्या खरेदी करण्यासाठी गडचिरोली शहरातील होंडा, हिरो, टीव्हीएस या शोरूममध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. गुरूवार व शुक्रवारी या दोन दिवसांत गडचिरोली जिल्ह्यात ५०० वर दुचाकी गाड्यांची विक्री झाली आहे. बीएस ३ नियमावलीचे अनुपालन करणारी शेकडो दुचाकी वाहने गडचिरोली येथील वितरकांकडे शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध होती. मात्र न्यायालयाच्या निर्णयाने ही वाहने विक्रीस १ एप्रिलपासून बंदी घातल्याने सदर वाहने विकण्यासाठी कंपन्यांनी भरघोस सवलतीची घोषणा केली. दुचाकी गाड्यांची किमत कमी झाल्याचे कळताच गडचिरोली शहरासह जिल्हाभरातील नागरिकांनी शोरूममध्ये गर्दी करून सवलतीत दुचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दुचाकी खरेदीत भरघोस सूट मिळविण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. त्यामुळे गडचिरोली शहरातील शोरूम रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होते. एक वितरक तर चक्क ६८ हजारची गाडी ५० हजारात न्या, असे ग्राहकांना सांगून वाहनांची विक्री करीत होता.